ऍप्पल-सॅमसंग वर लागला 126 कोटींचा दंड, संपूर्ण प्रकरण समजल्यावर व्हाल हैराण

जगातील सर्वात मोठया टेक व मोबाईल कंपन्या कोणत्या असे विचारल्यास ऍप्पल आणि सॅमसंगचे नाव सर्वात पुढे येते. या दोन्ही कंपन्यांनी स्मार्टफोन बाजारात वरचे स्थान मिळवले आहे. अनेक वर्षांपासून आपले प्रोडक्ट्स व टेक्नॉलॉजी सादर करणाऱ्या ऍप्पल आणि सॅमसंग ने संपूर्ण जगासहित भारतात पण नाव आणि इज्जत कमवली आहे. पण काही दिवसांपूर्वी अशी एक बाब समोर आली आहे ज्यामुळे ऍप्पल आणि सॅमसंगच्या प्रतिष्ठेला डाग लागला आहे. हे प्रकरण एवढे वाढले आहे कि ऍप्पलला जवळपास 84 कोटी तर सॅमसंगला जवळपास 57 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

हि बातमी मागच्या आठवड्यातील आहे जेवहा अचानक इंटरनेशनल मीडिया मध्ये बातम्या येऊ लागल्या कि जगातील सर्वात मोठ्या मोबाईल कंपन्या ऍप्पल आणि सॅमसंग वर गैरव्यवहार व ग्राहकांना हानी पोचवण्याच्या आरोपाखाली त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. कंपन्यांवरील आरोप सि​द्ध करत एंटी-ट्रस्ट अथॉरिटी एजीसीएम ने ऍप्पलला 1.15 कोटी डॉलर तर सॅमसंगला 57 लाख डॉलर चा दंड ठोठावला आहे इंडियन करंसी नुसार 84 कोटी आणि 42 कोटी रुपयांचं आसपास आहे.

मामला काय आहे
ऍप्पल आणि सॅमसंग वर आपले स्मार्टफोन्स स्लो म्हणजे धीमे करण्याचा आरोप लावण्यात आला आहे. आरोप असा होता कि ऍप्पल आणि सॅमसंग ने आपले नवीन स्मार्टफोन्स लॉन्च करण्याआधी आपल्या जुन्या आयफोन्स व स्मार्टफोन्स मध्ये काही अपडेट जारी केले आणि अपडेट्स फोन मध्ये इंस्टाल केल्यावर त्यांची प्रोसेसिंग धीमी झाली. ऍप्पल आणि सॅमसंग वर आरोप आहे कि आपल्या नवीन स्मार्टफोनची विक्री वाढवण्यासाठी कंपन्या आपल्या जुन्या हॅंडसेट्स वर नवीन अपडेट्स पाठवून त्यांना यूजर्सपासून लपवून संपूर्ण प्लानिंग साफच स्लो करत होत्या.

ऍप्पल व सॅमसंग वर हा आरोप इटली मध्ये लागला आहे. इटलीच्या एंटी-ट्रस्ट अथॉरिटी एजीसीएम ने दोन तपास केल्यानंतर हे आरोप खरे असल्याचे सांगितले आहे. एजीसीएम ने आपल्या रिपोर्ट मध्ये सांगितले आहे कि ऍप्पल व सॅमसंग ने आपल्या फोन यूजर्सना कंपनीच्या जुन्या फोन वर सॉफ्टवेयर अपडेट पाठवून त्यांना इंस्टॉल करण्यास प्रोत्साहित केले आहे. यात काही अपडेट्स असे पण होते ज्यांना कंपनीचे डिवाइस पूर्णपणे सपोर्ट पण करत नव्हते. या प्रक्रियेमध्ये दोन्ही कंपन्यांनी आपल्या यूजर्सना योग्य आणि संपूर्ण माहिती दिली नाही किंवा असा कोणताही पर्याय दिला नाही जेणेकरून त्रासदायक अपडेट काढता येईल.

एजीसीएम ने निर्णय देतं सांगितले कि ऑपरेटिंग सिस्टम अपडेट मुळे फोनच्या प्रोसेसिंग आणि फंक्शनिंग मध्ये अडचण निर्माण झाली तसेच अपडेट इंस्टाल केल्याने फोनचा वेग पण मंदावला. आणि जुने फोन स्लो झाल्यावर ऍप्पल व सॅमसंग ने यूजर्सना आपले नवीन लॉन्च झालेल्या आयफोन व स्मार्टफोनने ते रिप्लेस करणसाठी उदयुक्त पण केले. एखाद्या स्मार्टफोन ब्रँड वर असे आरोप सिद्ध होण्याची हि बाब पहिल्यांदाच घडली आहे.

पण इटली मधल्या या प्रकारानंतर भारतीय स्मार्टफोन यूजर्स पण हादरले आहेत. हि बातमी समोर आल्यानंतर ऍप्पल आयफोन यूजर व सॅमसंग स्मार्टफोन यूजर्स सोबतच इतर ग्राहक पण चिंतेत आहेत कि त्यांच्या फोन ब्रांड कडून येणारे ओएस व अन्य अपडेट त्यांच्यासाठी चांगले आहेत कि नाही. नाहीतर नवीन व व एडवांसच्या चक्कर मध्ये त्यांना त्यांचा चांगला चालणार स्मार्टफोन पण गमवावा लागायचा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here