Apple Event 2021 Highlights : M1 चिपसह लॉन्च झाले iPad Pro आणि iMac, जाणून घ्या अ‍ॅप्पलने कोणते नवीन प्रोडक्ट केले सादर

Apple Event 2021 Highlights: Apple ने आपल्या बहुप्रतीक्षित Spring Loaded इवेंटमध्ये अनेक प्रोडक्ट सादर केले आहेत. अ‍ॅप्पलने या इवेंटच्या माध्यमातून iPhone, नवीन iMac, iPad Pro 2021 मॉडेल, AirTag, आणि Apple TV 4K प्रोडक्ट सादर केले आहेत. Apple सीईओ टिम कुक यांनी या इवेंटमध्ये कंपनीच्या नवीन प्रोडक्ट अ‍ॅप्पल पॉडकास्ट इकोसिस्टम लॉन्च करत गेल्या काही महिन्यातील कंपनीच्या बिजनेसबद्दल माहिती शेयर केली आहे. इथे आम्ही तुम्हाला अ‍ॅप्पलच्या इवेंट (Apple’s Spring Loaded event 2021) बाबत संपूर्ण माहिती देत आहेत. (Apple event 2021 highlights M1 powered iPad Pro and iMac launched Airtag iPhone 12 Purple variant are announced)

M1-powered iPad Pro 2021

Apple ने या इवेंटमध्ये iPad Pro सीरीजचा लेटेस्ट टॅबलेट iPad Pro 2021 लॉन्च केला आहे. नवीन iPad Pro ची डिजाइन गेल्यावर्षी सारखी आहे. हा टॅब दोन स्क्रीन साइज 11-इंच आणि 12.9 इंचात सादर केला आहे. नवीन iPad Pro टॅबची सर्वात मोठी हाइलाइट अशी आहे कि नवीन टॅब कंपनीच्या लेटेस्ट Apple Silicon M1 चिपसह सादर केला गेला आहे. या चिपसेटमुळे नवीन टॅबमध्ये युजर्सना MacBook प्रमाणे परफॉर्मन्स मिळेल. iPad Pro 2021 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात Liquid Retina XDR डिस्प्ले, 5G, 2TB पर्यंत स्टोरेज, थंडरबोल्ट आणि USB 4 पोर्ट देण्यात आला आहे. iPad Pro 2021 ची किंमत पाहता 11-इंचाच्या मॉडेलच्या 128GB वेरिएंटची किंमत 71,900 रुपये आहे. तर 12.9-इंचाचा iPad Pro 2021 भारतात 99,900 रुपयांच्या बेस किंमतीत सादर केला आहे.

APPLE IPAD PRO 11-INCH (WI-FI ONLY) APPLE IPAD PRO 11-INCH (WI-FI + CELLULAR) APPLE IPAD PRO 12.9-INCH (WI-FI ONLY) APPLE IPAD PRO 12.9-INCH (WI-FI + CELLULAR)
128GB Rs 71,900 Rs 85,900 Rs 99,900 Rs 1,13,900
256GB Rs 80,900 Rs 94,900 Rs 1,08,900 Rs 1,22,900
512GB Rs 98,900 Rs 1,12,900 Rs 1,26,900 Rs 1,40,900
1TB Rs 1,34,900 Rs 1,48,900 Rs 1,62,900 Rs 1,76,900
2TB Rs 1,70,900 Rs 1,84,900 Rs 1,98,900 Rs 2,12,900

 

M1-powered iMac 2021

iMac ची डिजाइन कंपनीने अनेक वर्षानंतर बदलली आहे. नवीन Mac PC आधीच्या तुलनेत पातळ आहे आणि हा पण M1 चिपसह 8-कोर CPU सह सादर केला गेला आहे. Apple ने मॅकमध्ये नवीन कलर वेरिएंट पण उपलब्ध केला आहे. त्याचबरोबर iMac च्या फ्रंटला कंपनी 1080p FaceTime कॅमेरा पण देत आहे. iMac कंपनीने 24-इंच रेटिना डिस्प्ले, 6-स्पीकर सेटअप, तीन माइक्रोफोन दिले आहेत जो स्टुडियो ग्रेड क्वालिटी ऑफर करतो. तसेच यात चार थंडरबोल्ट पोर्ट देण्यात आले आहेत. ग्राहकांना नवीन iMac सह Magic Keyboard मिळत आहे ज्यात Touch ID फिंगरप्रिंट सेंसर आहे. iMac 2021 ची किंमत पाहता हा भारतात 1,19,900 रुपयांच्या बेस किंमतीत सादर केला गेला आहे.

iMac 2021

2021 APPLE IMAC M1 (8-CORE CPU, 7-CORE GPU) APPLE IMAC 2021 (8-CORE CPU, 8-CORE GPU)
8GB RAM + 256GB SSD Rs 1,19,000 Rs 1,39,900
8GB RAM + 512GB SSD Rs 1,59,900

 

iPhone 12 and iPhone 12 Mini नवीन कलर

Apple iPhone 12 आणि iPhone 12 Mini चा नवीन पर्पल कलर वेरिएंट पण लॉन्च केला गेला आहे. या नवीन कलर वेरिएंटची किंमत पाहता हा रेगूलर मॉडेल सारखाच आहे. iPhone 12 आणि iPhone 12 Mini दोन्ही विक्रीसाठी 30 एप्रिलपासून येतील.

iphone 12 purple

Apple AirTag

अनेक वर्षे चर्चेत राहिल्यानंतर अ‍ॅप्पलने अखेरीस AirTag लॉन्च केला आहे. Apple च्या ट्रॅकिंग डिवाइसच्या मदतीने युजर्स आपली हॅन्डबॅग, बॅकपॅक, की चेन आणि इतर गोष्टी ट्रॅक करू शकतील. हे ट्रॅकिंग डिवाइस U1 चिपसह सादर केले गेले आहेत जे अ‍ॅप्पलच्या Find My इकोसिस्टमवर काम करतात. Apple AirTag कंपनीने IP67 रेटिंगसह सादर केले आहेत. हा NFC, Bluetooth LE सह सादर केला गेला आहे. Apple AirTag च्या सिंगल डिवाइसची किंमत 3,190 रुपये आणि चार AirTag पॅकची किंमत 10,900 रुपये आहे.

AirTag

APPLE AIRTAG
1 pack Rs 3,190
4 pack Rs 10,900

Apple TV 4K refresh

Apple ने नवीन iMac, iPad आणि iPhone सह Apple TV चा पण अपग्रेड वर्जन लॉन्च केला आहे. या इवेंटमध्ये कंपनीने Apple TV 4K पण सादर केला आहे. Apple TV 4K कंपनीने हायर रिफ्रेश रेट आणि Dolby Vision टेक्नोलॉजीसह सादर केला आहे. याची क्वालिटी आणि परफॉर्मन्स सुधारण्यासाठी यात Apple A12 Bionic चिप देण्यात आली आहे. Apple TV 4K भारतात 18,900 रुपयांच्या बेस किंमतीत सादर केला गेला आहे.

APPLE TV 4K (2021)
32GB Rs 18,900
64GB Rs 20,900

 

Apple Podcast ला मिळाली नवीन डिजाइन

Apple Podcast सर्विस अ‍ॅपला कंपनीने सुधारले आहे. हा अ‍ॅप आधीपेक्षा जास्त इंफॉर्मेटिव आणि युजर फ्रेंडली डिजाइनसह आला आहे. नवीन डिजाइन सिंगल टॅप फीचरसह सादर केला गेला आहे. म्हणजे युजर्स सहज कंटेंट अ‍ॅक्सेस करू शकतील. अ‍ॅप्पलची सब्सक्रिप्शन बेस्ड स्ट्रीमिंग पॉडकास्ट सर्विस पुढल्या महिन्यापासून 170 प्रदेशांमध्ये आणि देशांमध्ये सुरु होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here