आला आयओएस 12, आता अजुन स्मार्ट होतील आयफोन, अपडेट झाले आहेत हे शानदार नवीन फीचर्स

जगातील प्रसिध्द टेक कंपनी अॅप्पल आपल्या प्रोडक्ट्स सह आपल्या ‘क्लास’ साठी पण ओळखली जाते. काल अॅप्पल ने आपली वार्षिक वर्ल्डवाइड डेवलपर्स कांफ्रेंस (WWDC) 2018 चे आयोजन करून अॅप्पल फॅन्स साठी अनेक नवीन घोषणा केल्या. नवीन प्रोडक्ट्स सह अॅप्पल ने आयफोन यूजर्स साठी आॅपरेटिंग सिस्टम आयओएस 12 पण सादर केला आहे. अॅप्पल सीईओ टीम कुक ने वार्षिक समारंभात आयओएस सादर करत याच्या शानदार फीचर्स ची माहिती दिली.

आयओएस 12 मुळे जुन्या फीचर्स अजूनच एडवांस होऊन समोर आले आहेत तसेच अॅप्पल ने नवीन फीचर्स पण यूजर्स साठी सादर केले आहेत. कंपनी नुसार आयओएस 12 वर अपडेट नंतर आयफोन 40 टक्के फास्ट होईल तर फोन चा कीबोर्ड पण 50 टक्के वेगाने काम करेल. अॅप्पल आयओएस 12 त्या सर्व डिवाईस व आयफोन वर उपलब्ध होईल ज्यात आयओएस 11 आहे. चला बघुया आयओएस 12 चे शानदार आणि मजेदार फीचर्स :

@

आग्यूमेंटेड रियालिटी (एआर) : अॅप्पल आयफोन मध्ये एआर एक्स​पीरियंस सुधारण्यासाठी अॅप्पल 3डी फीचर अपडेट करत आहे. त्यासाठी अॅप्पल आयओएस आता अडोब आणि यूएसडीसी सपोर्ट सह येईल जे एआर अनुभव अजून शानदार बनवेल. यूएसडीसी मुळे कोणत्याही आर्टिकल मधील फोटो पण आग्यूमेंटेड रियालिटी सह 3डी मध्ये एक्सपीरियंस करता येईल.

मेजर अॅप : मेजर अॅप ने कोणत्याही आब्जेक्ट चा फोटो क्लिक करून त्याची साईज पण मोजता येईल. जसे की समोर ठेवलेल्या कोणत्याही टेबल चा फक्त फोटो घेऊन तुम्हाला कळेल की त्या टेबल ची ऊंची व लांबी किती आहे.
एआर किट 2: आग्यूमेंटेड रियालिटी चा मल्टीयूजर अनुभव देण्यासाठी अॅप्पल ने LEGO सोबत पार्टनरशिप केली आहे. LEGO एआर अॅप्पल अॅप स्टोर वर उपलब्ध होईल. अपडेट नंतर एआर फाइल्स सफारी, आयमेसेज इत्यादि मधुन शेयर करता येतील.

फोटोज: आयओएस 12 च्या या नवीन अपडेट नंतर फोन मध्ये फोटो सर्च करणे अजून सोप्पे होईल. नवीन आयओएस अपडेट मध्ये फोटो मध्ये ‘फॉर यू’ टॅब जोडण्यात आली आहे. तसेच फोटो शेयरिंग सोप्पी करण्यासाठी अॅप्पल ने सजेस्शन सारखे फीचर पण अपडेट केला आहे.

सीरी: आयफोन यूजर च्या पर्सनल असिस्टेंट ‘सीरी’ ला अपेडट करून कंपनी ने यात शॉर्टकट फीचर जोडला आहे. अपडेट नंतर सीरी यूजर्स कडून केल्या जाणार्‍या कामां नुसार त्यांना सजेशन्स देत राहील. तसेच या नवीन फीचर च्या मदतीने सिरी ला स्वतः च्या कमांड ने सिंक करून त्याला अन्य अॅप्स शी जोडता येईल.

ग्रुप फेस टाइम : फेस टाइम ची वीडियो चॅट आता फक्त दोन लोकांपूर्ती मर्यादित नाही राहणार. फेस टाइम वर आता एक साथ 32 लोकांशी चॅट करता येईल. ग्रुप फेस टाइम मध्ये मजेदार बाब म्हणजे यात जी व्यक्ति बोलत असेल त्याची चॅट विंडो स्वतः हून मोठी होईल. कंपनी ने यात ऐनिमोजी आणि मेमोजी सारखे फीचर्स पण अपडेट केले आहेत. आयफोन 10 मध्ये आता आपल्या आॅनलाईन अवतार ला आपल्या आवडी नुसार कस्टमाइज पण करता येईल.

नवीन अॅप :
डू नॉट डिस्टर्ब मोड आॅन होताच यूजर्सना ज्या नोटिफिकेशन नको असतील त्या बंद होतील.
नोटिफिकेशन्स – आयओएस 12 मध्ये लॉक स्क्रीन वरून नोटिफिकेशन्स बघता किंवा इग्नोर करता येतील. तसेच यात ग्रुप नोटिफिकेशन ला पण सपोर्ट देण्यात आला आहे.
स्क्रीन टाइम नवीन आयओएस मध्ये येण्याने तुमच्या आयफोन चा वापर कधी झाला आणि कधी आयफोन वर काय काम करण्यात आले, याचा रिपोर्ट मिळेल. तसेच कोणत्या अॅप वर किती वेळ घालवला गेला ही माहिती पण मिळेल.
आयओएस 12 मध्ये आयबुक अॅप्पल बुक्स झाले आहे, तर अॅप्पल न्यूज आता स्टॉक्स मध्ये पण दिसेल. न्यूज अॅप मध्ये नेविगेशन आणि ब्राउजिंग विजेट पण असेल.
अॅप्पल ने आयओएस 12 मध्ये न्यू डिजीटल हेल्थ अॅप ला पण अपडेट केले आहे.
अॅप्पल ने आयपॅड मध्ये वॉयस मेमो पण यावेळी उपलब्ध केला आहे. आयओएस 12 मध्ये कार प्ले थर्ड पार्टी नेविगेशन अॅप्स ला पण करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here