अॅप्पल आयफोन च्या बॅटरी मध्ये आली मोठी समस्या, जगभरातून येत आहेत तक्रारी, जाणून घ्या पूर्ण मामला

दिग्गज टेक कंपनी अॅप्पल ने काही दिवसांपूर्वी आपल्या वार्षिक समारंभात आयओएस चा नवीन वर्जन आयओएस 12 सादर केला आहे. नवीन आयओएस अनेक नवीन फीचर्स सह अपडेट झाला आहे जो आगामी दिवसांमध्ये आयफोन यूजर्सना मिळेल. पण आयओएस 12 रोलआउट होण्याआधी आयफोन यूजर्सना एका वेगळ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे जी त्यांच्या फोन मधील आयओएस 11.4 मुळे येत आहे. जगभरातील लोकांकडून तक्रारी येत आहेत की आयओएस मुळे अचानक त्यांच्या फोेनची बॅटरी ड्रेन होत आहे.

मीडिया रिपोर्ट्स नुसार मागच्या महिन्यात रोलआउट झालेल्या आयओएस 11.4 आयफोन मध्ये अपडेट केल्यानंतर फोन च्या बॅटरी मध्ये समस्या येत आहे. आयफोन ची बॅटरी लवकर संपत असल्याची बाब उघडकीस आली आहे. बॅटरी लवकर संपत असल्याची तक्रार अनेक यूजर्सनी अॅप्पल कडे पण केली आहे. आयओएस 11.4 वर अपडेट केल्यानंतर एका आयफोन यूजर ने सांगितले की त्याच्या फोनची बॅटरी खुपच वेगाने संपत आहे. आयफोन मध्ये मेसेज 33 टक्के बॅटरी वापरत आहे.

ios-11

हि समस्या अॅप्पल आयफोन 6 आणि आयफोन 6एस तसेच आयपॅड मध्ये सर्वात जास्त दिसत आहे. आयओएस 11.4 बद्दल काही यूजर्स चे म्हणेन आहे की या आयओएस वर आयफोन अपडेट केल्यानंतर विना कोणत्याही कॉल किंवा मेसेज त्यांच्या फोन ची बॅटरी 100 टक्क्यांवरून सरळ 70 टक्के होते. यूजर्स ने बॅटरी चा अधिक वापर होण्याची समस्या नवीन आयओएस शी जोडली आहे आणि अॅप्पलला ही सुधारण्यास सांगितले आहे.

पण अॅप्पल ने अजून पर्यंत या समस्येवर कोणतेही विधान केले नाही. आयओएस 11.4 मुळे निर्माण झालेल्या या समस्येनंतर आयफोन यूजर्सना सल्ला दिला जात आहे की त्यांनी आपल्या आयफोन ला पुन्हा आयओएस 11.3 वर अपडेट करावे, कदाचित त्यामुळे या समस्येवर तात्पुरते उत्तर मिळेल. जर तुम्ही पण आयफोन यूजर असाल आणि आयओएस 11.4 वर फोन अपडेट केला असेल तर सांगा तुम्हाला पण बॅटरी संबधी अशी कोणती समस्या येत आहे की नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here