आयफोन घेण्याची सुवर्णसंधी, अॅप्पल ने आयफोन्सच्या किंमती 17,000 रुपयांनी कमी केल्या

अॅप्पल ने लोकांची प्रतीक्षा संपवत नवीन आयफोन जागतिक मंचावरून लॉच केले आहेत. अॅप्पल ने आयफोन 10एस, आयफोन 10एस मॅक्स आणि आयफोन 10आर लॉन्च केले आहेत. पावरफुल प्रोसेसिंग आणि शानदार फीचर्स असलेले हे फोन्स सादर करण्या सोबतच कंपनी ने आपल्या फॅन्सना अजून एक भेट दिली आहे. अॅप्पल ने आपल्या सर्व जुन्या आयफोन्सच्या किंमती कमी केल्या आहेत. आयफोन 10 सोबत आयफोन 8 सीरीज, आयफोन 7 सीरीज आणि आयफोन 6 सीरीजचे सर्व आयफोन मोठ्या प्राइस कट सह सेल साठी उपलब्ध झाले आहेत.

आयफोन 10

सर्वात आधी आयफोन 10 बद्दल बोलू, या फोनचा 256 जीबी वेरिएंट आधी 1,08,930 रुपयांमध्ये मिळत होता पण आता हा फोन 1,06,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे फोनचा 64 जीबी वाल्या वेरिएंट ची किंमत 95,390 रुपयांन वरून 91,900 रुपये झाली आहे.

आयफोन 8 / 8 प्लस

अॅप्पल आयफोन 8 प्लस चा 256जीबी वेरिएंट आता पर्यंत 91,110 रुपयांमध्ये ​सेल साठी उपलब्ध होता. पण आता प्राइस कट सह हा वेरिएंट 84,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच आयफोन 8 प्लस चा 64जीबी वेरिएंट आधी 77,560 रुपयांमध्ये विकला जात होता पण आता हा 69,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

आयफोन 8 पाहता या फोनचा 256जीबी वेरिएंट आधी 81,500 रुपयांमध्ये उपलब्ध होता पण नवीन किंमती नंतर हा 74,900 रुपयांमध्ये मिळेल. तसेच आयफोन 8 चा 64 जीबी वेरिएंट 67,940 रुपयांच्या ऐवजी आता 59,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

आयफोन 7 / 7 प्लस

अॅप्पल ने सर्वात मोठी प्राइस कट आपल्या 7 जेनरेशन आयफोन मध्ये केली आहे. आयफोन 7 प्लस चा 128जीबी वेरिएंट आधी 72,060 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होता पण आता हा 59,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 62,840 रुपयांमध्ये ​मिळणारा आयफोन 7 प्लस चा 32 जीबी वेरिएंट आता 49,900 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध झाला आहे.

आयफोन 7 च्या 128जीबी वेरिएंट ची किंमत 61,560 रुपयांवरून 49,900 रुपये झाली आहे तसेच 52,370 रुपयांमध्ये मिळणारा आयफोन 7 चा 32जीबी वेरिएंट फक्त 39,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

आयफोन 6एस / 6एस प्लस

128जीबी स्टोरेज वाल्या आयफोन 6एस प्लस ची किंमत अॅप्पल ने सरळ 16,550 रुपयांनी कमी केली आहे. हा फोन आधी 61,450 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होता पण आता हा फोन 44,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे फोनच्या 32जीबी वेरिएंट ची किंमत पण 52,240 रुपयांवरून 34,900 रुपये झाली आहे. म्हणजे या फोनच्या किंमती मध्ये पण 17,340 रूपयांची मोठी कपात झाली आहे.

तसेच आयफोन 6एस चा 128जीबी वेरिएंट आता 52,100 रुपयांऐवजी 34,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल तसेच फोनचा 32जीबी वेरिएंट 42,900 रुपयांऐवजी फक्त 29,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

सोबतच तुम्हाला नवीन आयफोन्सच्या भारतातील किंमती पण सांगतो…

आयफोन 10एस भारतात 64जीबी, 256जीबी आणि 512जीबी मेमरी सह उपलब्ध होईल आणि या तिन्ही वेरिएंट्स ची किंमत क्रमश: 99,900 रुपये, 1,14,900 रुपये आणि 1,34,900 रुपये असेल.

आयफोन 10एस मॅक्स चा 64जीबी वेरिएंट 1,09,900 रुपये, 256जीबी मॉडेल 1,24,900 तसेच फोनचा 512जीबी वेरिएंट 1,44,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

आयफोन 10आर 64जीबी, 128जीबी आणि 256जीबी मॉडेल्स मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. फोनच्या 64जीबी वेरिएंट ची किंमत 76,900 रुपये आहे. त्याचबरोबर 128जीबी वेरिएंट 81,900 रुपये तसेच 256जीबी मेमरी वेरिएंट 91,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

आयफोन 10एस आणि आयफोन 10एस मॅक्स भारतीय बाजारात 28 सप्टेंबर पासून सेल साठी उपलब्ध होतील आयफोन 10आर चा सेल 26 सप्टेंबर पासून सुरू होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here