सर्वात अनोख्या कॅमेरा सेटअप सह ASUS 6Z झाला भारतात लॉन्च

ASUS नेगेल्या महिन्यातच अंर्तराष्ट्रीय बाजारात आपल्या टेक्नॉलॉजी आणि क्षमतेचे प्रदर्शन करत एक अनोखा आणि शानदार स्मार्टफोन ASUS 6Z सादर केला होता. हा स्मार्टफोन पावरफुल स्पेसिफिकेशन्स सोबतच शानदार कॅमेरा डिजाईनमुळे लोकांना आवडला होता. आज आपल्या इंडियन फॅन्सना खुश करत कंपनी ने ASUS 6Z भारतीय बाजारात पण आणला आहे. ASUS ने 6झेड स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे जो 26 जून पासून सेल साठी उपलब्ध होईल.

लुक व डिजाईन

ASUS 6Z खास डिजाईन सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये कॅमेरा मॉड्यूल या जगात असलेल्या सर्व स्मार्टफोन्स पेक्षा याला वेगळा बनवतो. पॉप-अप आणि स्लाइड आउट कॅमेरा पुढे जाऊन असूस ने हा फोन फ्लिप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च केला आहे. फोनचा बॅक कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा एकच आहे. ASUS 6Z मध्ये रियर कॅमेरा सेटअप फोनच्या बॅक पॅनल वर वरच्या बाजूला देण्यात आला आहे. हा सेटअप फ्लिप हिंच वर आहे. सेल्फीची कमांड देताच हा कॅमेरा सेटअप वर येतो आणि फ्रंट कॅमेऱ्याचे काम करतो.

फोनचा फ्रंट पॅनल पूर्णपणे बेजल लेस आहे ज्यावर कोणतेही फिजिकल बटण व नॉच नाही. कंपनीने या फोनच्या कॅमेरा सेटअप मध्ये दोन कॅमेरा सेंसर दिले आहेत जे फ्लॅश लाईट सह येतात. बॅक पॅनल वरच कॅमेरा सेटअपच्या खाली फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. हा फोन ग्लॉस बॉडी वर बनला आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर सोबत पावर बटण पण देण्यात आला आहे.

अनोखा कॅमेरा सेटअप

वर सांगितल्याप्रमाणे ASUS 6Z जगातील पहिला फोन आहे ज्यात अशाप्रकारची कॅमेरा डिजाइन उपलब्ध आहे. कंपनीने हा कॅमेरा मोटराइज्ड सेटअप सह सादर केला आहे आणि कंपनीने कॅमेऱ्याला कंट्रोल करण्याचे फीचर स्क्रीन वर दिले आहे. त्यामुळे कॅमेरा फ्लिप होऊन जेव्हा समोर येतो तेव्हा फ्लिप मध्ये थांबवता येतो. तसेच यात मोशन कंट्रोल पण आहे ज्याने कॅमेरा स्वतः फिरत्या सब्जेक्टला ट्रॅक करतो. कंपनीने यात ऑटो लेजर फोकस आणि डुअल एलईडी फ्लॅश दिला आहे. कॅमेरा तुम्ही मॅनुअली पण फिरवू शकता.

दमदार स्पेसिफिकेशन्स

ASUS 6Z चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर बनला आहे जो 1,080 x 2,340 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.4-इंचाच्या फुलएचडी+ आईपीएस डिस्प्लेला सपोर्ट करतो. डिस्प्लेच्या प्रोटेक्शन साठी कंपनीने हा कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्ट केला आहे. झेनफोन सीरीजचा हा नवीन डिवाईस एंडरॉयड 9 पाई आधारित झेनयूआई 6 वर सादर करण्यात आला आहे जो क्वालकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 वर चालतो. सोबतच चांगल्या ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 640 जीपीयू देण्यात आला आहे.

कॅमेरा सेटअप पाहता ASUS 6Z डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. यात एफ/1.79 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 13-मेगापिक्सलचा वाइड एंगल सेंसर आहे जो 125डिग्री पर्यंत वाइड एंगलची क्षमता देतो. सिक्योरिटी साठी ASUS 6Z च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. फोन मध्ये एनएफसी, डुअल-बॅंड वाई-फाई आणि यूएसबी टाईप-सी पोर्ट सारखे फीचर्स आहेत. तसेच पावर बॅकअप साठी ASUS 6Z मध्ये 18वॉट चार्जर सह फास्ट चार्जिंग 4.0 असलेली 5,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.

रॅम व स्टोरेज

ASUS 6Z कंपनीने भारतात 3 वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. फोनचा सर्वात मोठा वेरिएंट 8जीबी रॅम सह 256जीबी च्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. इतर वेरिएंट्स पाहता फोनचा एक वेरिएंट 6जीबी रॅम सह 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे.

किंमत व सेल

ASUS 6Z च्या किंमतीबद्दल बोलायचे तर फोनचा 6जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट 31,999 रुपये, 6जीबी रॅम + 128जीबी मेमरी वेरिएंट 34,999 रुपये तर 8जीबी रॅम + 256जीबी मेमरी वेरिएंट 39,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे. हा फोन कंपनीच्या वेबसाइट सोबत शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर 26 जून पासून विकत घेता येईल. फ्लिपकार्ट ASUS 6Z च्या खरेदीवर फक्त 99 रुपयांमध्ये कंपलीट प्रोटेक्शन पण देत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here