असूस ने लॉन्च केला जगातील सर्वात फास्ट गेमिंग फोन ROG, जाणून घ्या या दमदार फोन बद्दल सर्वकाही

मोबाइल फोन मध्ये गेमिंग बद्दल नेहमीच बोलले जाते पण एक चांगला गेमिंग फोन चा विषय येतो तेव्हा तुम्ही विचारात पडता. काही दिवसांपूर्वी शाओमी ने ब्लॅक शार्क नावाने गेमिंग फोन सादर केला आहे. त्याचप्रमाणे आता असूस ने पण या सेग्मेंट मध्ये पाऊल ठेवले आहे. कंपनी ने तैवान मध्ये आयोजित कंप्यूटेक्स इवेंट मध्ये गेमिंग फोन आरओजी ;रिपब्लिक आॅफ गेमर्सद्ध चे प्रदर्शन केले आहे. पण हा फोन भारतात येईल की नाही हे स्पष्ट नाही पण कंपनी ने गेमिंग सीरीज ची सुरवात केली आहे.

गेमिंग च्या नावावर फक्त साधा फोन लॉन्च करण्याची पद्धत सुरू झाली आहे. पण असूस ने आपल्या या फोन मध्ये खास गेमिंग फीचर्स दिले आहेत. या फोन मध्ये जगातील सर्वात ताकदवान प्रोसेसर दिला आहे. कंपनी ने असूस आरओजी ला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट सह सादर केला आहे. जरी या चिपसेट वर आता पर्यंत अनेक फोन आले असले तरी आरओजी चा प्रोसेसर सर्वात वेगवान आहे. असूस आरोजी मध्ये तुम्हाला 2.96गीगाहर्ट्ज चा आॅक्टा कोर प्रोसेसर मिळेल. आता पर्यंत एवढा क्लॉक स्पीड कोणत्याही फोनचा नाही.

तसेच या फोन मध्ये तुम्हाला एड्रीनो 630 जीपीयू मिळेल ज्या सोबत कंपनी ने गेमकूल वॅपर चेंबर सादर केला आहे जो गेमिंग मध्ये फोन थंड ठेवतो. यात 8जीबी रॅम दिला आहे आणि हा 128जीबी व 512जीबी च्या दोन मेमरी वेरियंट मध्ये उपलब्ध आहे.

गेमिंग फोन मध्ये जर डिस्प्ले चांगला नसेल तर मजा येत नाही. कंपनी ने हे लक्षात ठेवले आहे. असूस आरओजी मध्ये तुम्हाला 6—इंचाची 2160×1080 पिक्सल रेजल्यूशन वाली फुल एचडी+ स्क्रीन देण्यात येईल. कंपनी ने एमोलेट डिस्प्ले वापरला आहे जो 90हट्र्ज रिफ्रेश रेट सह उपलब्ध आहे. एवढेच नाही तर हा फोन 10,000 कॉन्ट्रास्ट रेशियो सह येतो आणि यात 10 प्वाइंट मल्टीटच सपोर्ट आहे. गेमिंग च्या उत्तम अनुभवासाठी असूस आरओजी मध्ये खास इमेज प्रोसेसिंग चिप आहे जी एचडीआर ला सपोर्ट करते.

त्याचबरोबर आसूस आरओजी ची डिजाइन पण गेमर्स ला लक्षात ठेऊन बनवण्यात आली आहे. या फोन मध्ये तुम्हाला साइड माउंटेनपोर्ट, प्रोग्रामेबल अल्ट्रासोनिक एयर​ट्रिगर सेंसर आणि फोर्स ​फिडबॅक सिस्टम देण्यात आली आहे. यात डॉक सपोर्ट पण आहे आणि तुम्ही ट्विन व्यू डॉक, मोबाइल डेस्कटॉप डॉक आणि गेमवाइस कंट्रोल वाईगीग डॉक चा वापर करू शकता. आसूस आरओजी मध्ये फोटोग्राफी साठी तुम्हाला 8—एमपी चा सेल्फी कॅमेरा मिळेल. तसेच कंपनी ने यात डुअल रियर कॅमेरा दिला आहे. फोन मध्ये 12—एमपी + 8—एमपी चा वाइड एंगल रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. हा फोन डीटीएस हेडफोन ला सपोर्ट करतो आणि यात 7.1 सराउंड साउंड सह सादर करण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये कंपनी ने क्वालकॉम ऐप्टएक्स हाई डेफिनेशन ब्लेटूथ वायरलेस आॅडिया सपोर्ट दिला आहे जो तुमच्या म्यूजिक आणि गेमिंग साउंड ला उत्तम बनवतो.

डाटा कनेक्टिविटी साठी यात 4जी वोएलटीई ला सपोर्ट आहे. तसेच पावर बॅकअप साठी 4,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here