6000mAh बॅटरी आणि 12GB रॅम असलेला नॉन चायनीज ASUS ROG Phone 3 भारतात झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत

गेमिंगच्या चाहत्यांसाठी Asus ने आज आपला नवीन गेमिंग स्मार्टफोन ROG Phone 3 लॉन्च केला आहे. कोरोना वायरसमुळे ROG म्हणजे Republic of Gamers कॅटेगरी मधील हा पावरफुल गेमिंग स्मार्टफोन ऑनलाइन प्लेटफॉर्म वर लॉन्च केला गेला आहे. ASUS ROG Phone 3 भारतात कंपनी वेबसाइट व्यतिरिक्त फ्लिपकार्ट वर पण विक्रीसाठी उपलब्ध होईल. चला जाणून घेऊया या फोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि डिजाइनची माहिती.

डिजाइन

डिजाइनच्या बाबतीत आसुसने ROG Phone 3 वर खूप काम केले आहे. इतर स्मार्टफोन्सच्या गर्दीत हा फोन आपल्या शानदार आणि प्रीमियम लुकमुळे उठून दिसतो. ROG Phone 2 प्रमाणे कंपनीने नवीन ROG Phone 3 च्या बॅक पॅनल वर RGB लाइटिंग दिली आहे, ज्यामुळे हा फोन खास ठरतो. फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप लँडस्केप पोजिशन मध्ये आहे.

फोनच्या टॉप आणि बॉटमला जाडे बेजल्स आहेत. LED नोटिफिकेशन फोनच्या टॉपला स्पीकरच्या डावीकडे देण्यात आली आहे. साइड शोल्डर पॅनल्स वर अल्ट्रा साउंड बटण देण्यात आला आहेत, ज्याचा वापर गेम खेळताना करता येईल.

144Hz रिफ्रेश रेट असलेली स्क्रीन

फोन मध्ये 144Hz रिफ्रेश रेट सह 6.59 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. बायॉमेट्रिक सिक्यॉरिटीसाठी फोन मध्ये ऑन-स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. फोनचा डिस्प्ले 10-बिट HDR10 + सपोर्ट सह येतो आणि यात 270Hz टच सॅम्पलिंग रेट मिळेल. फोनचा डिस्प्ले 2340×1080 पिक्सल रिजोल्यूशन सह 2.5D कोर्निंग गोरिल्ला 6 ग्लास प्रोटेक्शन सह येतो.

क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 प्लस

कंपनीने या फोन मध्ये नवीन आणि दमदार चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 865 प्लस दिला आहे. 7nm 64-बिट ऑक्टा-कोर प्रोसेसर स्नॅपड्रॅगॉन 865 प्लस एंड्रॉयड डिवाइसचा आतापर्यंतचा सर्वात वेगवान चिपसेट आहे ज्याचा कमाल वेग 3.1 गीगाहर्ट्ज आहे. स्नॅपड्रॅगॉन 865 प्लस मध्ये ग्राफिक्ससाठी Adreno 650 GPU मिळेल, याच्या सीपीयू चा वेग 3.1GHz आहे जो आतापर्यंतचा सर्वात जास्त वेग आहे.

गेमिंगसाठी हा आहे खास

हेवी गेमिंग करताना फोन गर्म होऊ नये म्हणून यात खास “GameCool 3” कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे. हि सिस्टम सतत गेमिंग केल्यावर पण हा फोन गरम होऊ देत नाही. तसेच फोन हॅप्टिक फीडबॅक सह येणाऱ्या टच सेंसिटिव अल्ट्रासॉनिक बंपर/शोल्डर बटण एयरट्रिगर 3 टेक्नॉलॉजीमुळे आधीपेक्षा चांगला चालतो. आता हे बटण स्लाइड आणि स्पाइप पण करता येतात आणि आता यातील प्रत्येक बटण दोन भागांमध्ये विभागता पण येतो, ज्याचा अर्थ असा आहे कि दोन बटण चार वेगवगेळे काम करता येतील.

कॅमेरा

कॅमेरा पाहता फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात F1.8 अपर्चर सह 64 SONY IMX686 चा मेन सेंसर आहे. फोन मध्ये अपर्चर F2.4 सह 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेंसर आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर देण्यात आला आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटला अपर्चर F2.0 सह 24 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी आणि कनेक्टिविटी

कंपनीने या फोन मध्ये 6000mAh ची बॅटरी दिली आहे जी 30 वॉट फास्ट चार्जिंग सपॉर्ट सह येते. तसेच दोन रॅम आणि स्टोरेज वेरिएंट मध्ये हा फोन सादर केला गेला आहे. डिवाइस मध्ये 8GB रॅम सह 128GB स्टोरेज आणि 12GB रॅम सह 256GB स्टोरेजचा ऑप्शन देण्यात आला आहे. स्मार्टफोनची स्टोरेज वाढवण्याचा कोणताही ऑप्शन ग्राहकांना मिळत नाही. फोन मध्ये 5G सपोर्ट सह बेसिक कनेक्टिविटी फीचर्स देण्यात आला आहेत.

किंमत

Asus ROG Phone 3 च्या 8GB रॅम सह 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 49,999 रुपये आणि 12GB रॅम सह 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 57,999 रुपये आहे. फोनची विक्री फ्लिपकार्ट वर 6 ऑगस्ट पासून केली जाईल. यूरोप मध्ये फोनचा 16जीबी रॅम आणि 512जीबी स्टोरेज वेरिएंट 1099 यूरो (जवळपास 94,000 रुपये) मध्ये सादर केला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here