सर्वात ताकदवान प्रोसेसर आणि फ्लिप कॅमेरा असलेले ASUS ZenFone 7 आणि 7 Pro झाले लॉन्च, चीनी कंपन्यांना मिळेल टक्कर

तैवानच्या कंपनी Asus ने काल आपले नवीन स्मार्टफोन्स Asus ZenFone 7 आणि ZenFone 7 Pro सादर केले आहेत. दोन्ही नवीन झेनफोन 7-सीरीजचे स्मार्टफोन एका मोटराइज्ड फ्लिप कॅमेऱ्यासह आले आहेत जो गेल्यावर्षीच्या झेनफोन 6 उर्फ आसुस 6 झेड मधील कॅमेरा सिस्टम सारखा आहे. इतकेच नव्हे तर ZenFone 7 आणि ZenFone 7 Pro पण 90Hz AMOLED डिस्प्ले सपोर्ट आणि 30W फास्ट चार्जिंग सह सादर करण्यात आले आहेत. ZenFone 7 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 SoC आहे, तर ZenFone 7 Pro मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 865+ SoC आहे.

डिजाइन

ASUS ZenFone 7 आणि 7 Pro ASUS 6Z च्या डिजाइन वर सादर करण्यात आले आहेत. पॉप-अप आणि स्लाइड आउट कॅमेरा वगळून यावेळी पण असूस ने ASUS ZenFone 7 सीरीज मध्ये फ्लिप-अप सेल्फी कॅमेरा दिला आहे, यामुळे फोनचा बॅक कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा एकच आहे. हा सेटअप एका फ्लिप हिंज वर आहे. जो सेल्फीची कमांड दिल्यावर फ्लिप होऊन फ्रंट कॅमेऱ्याचे चालतो.

दोन्ही फोनचा फ्रंट पॅनल पूर्णपणे बेजल लेस आहे ज्यावर कोणतेही फिजिकल बटन व नॉच नाही. कंपनीने या फोनच्या कॅमेरा सेटअप मध्ये दोन कॅमेरा सेंसर दिले आहेत जे फ्लॅश लाईट सह येतात. उजव्या पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला जो पावर बटनचे चालतो आहे. उजव्याच पॅनल वर वाल्यूम रॉकर पण आहे.

Asus Zenfone 7 Pro चे स्पेसिफिकेशन्स

ASUS Zenfone 7 Pro 90Hz रिफ्रेश रेट सह 6.67-इंच AMOLED डिस्प्लेला सपोर्ट करतो. तसेच स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 SoC वर चालतो. तसेच फोन 8GB LPDDR5 रॅम आणि 256GB UFS 3.1 स्टोरेज सह येतो.

ASUS Zenfone 7 Pro मध्ये एक मोटराइज्ड ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, जो सेल्फी स्नॅपरचे पण काम करतो. ट्रिपल कॅमेरा सेटअप मध्ये 12MP Sony IMX363 अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस, 64MP वाइड-अँगल Sony IMX686 सेंसर, आणि 8MP टेलिस्कोप लेंस सह 3x ऑप्टिकल अँगल सह 12x डिजिटल झूम सह LED फ्लॅश पण आहे. कंपनीचा दावा आहे कि नवीन डिजाइन करण्यात आलेल्या शूटिंग इंटरफेस यूजर्सना लेंसचा फ्लिप अँगल नियंत्रित करू देतो. ZenFone 7 Pro मोठ्या 5000mAh बॅटरी सह येतो आणि 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.

ASUS Zenfone 7 चे स्पेसिफिकेशन्स

ASUS Zenfone 7 मध्ये पण Zenfone 7 Pro मॉडल प्रमाणे डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 6.67-इंचाचा FHD + (2400 × 1080) HDR + ऐमोलेड डिस्प्ले आहे जो HDR10 + सपोर्ट सह 20:9 आणि 90Hz च्या रिस्पॉन्स रेशियोला सपोर्ट करतो. स्मार्टफोन एड्रिनो 650 जीपीयू सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट वर आधारित आहे. तसेच झेनफोन 7 मध्ये 8GB रॅम आणि 256GB UFS 3.1 ऑनबोर्ड स्टोरेज आहे. कॅमेरा पाहता Zenfone 7 आणि Zenfone 7 Pro चे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स एक सारखे आहेत.

किंमत

Asus ZenFone 7 चा 6GB + 128GB वेरिएंट कंपनीने TWD 21,990 (जवळपास 55,700 रुपये) आणि 8GB + 128GB स्टोरेज ऑप्शन TWD 23,990 (जवळपास 60,100 रुपये) मध्ये सादर केला गेला आहे. सोबतच Asus ZenFone 7 Pro चा 8GB + 256GB स्टोरेज वेरीएंट TWD 27,990 (जवळपास 71,000 रुपये) मध्ये सादर केला गेला आहे. दोन्ही ZenFone 7 आणि ZenFone 7 Pro तैवान मध्ये लवकरच विक्रीसाठी येतील. पण भारतातील लॉन्च बाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here