4 कॅमेऱ्यांसह आला भन्नाट स्मार्टफोन; 6GB रॅमसह 5000mAh ची दमदार बॅटरी

50 mp camera phone huawei nova y61 launched check price specifications details

Huawei कंपनीनं ग्लोबल मार्केटमध्ये एक नवीन मोबाइल फोन Huawei Nova Y61 लाँच केला आहे. नोवा वाय61 कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर लाइव्ह करण्यात आला आहे जिथे फोनचे फोटोज, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती शेयर करण्यात आली आहे. हुवावे नोवा वाय61 स्मार्टफोन 50MP Camera, 6GB RAM, 22.5W fast charging आणि 5,000mAh battery ला सपोर्ट करतो. Huawei Nova Y61 ची संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे.

Huawei Nova Y61 Specifications

हुवावे नोवा वाय61 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा मोबाइल फोन 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.52 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच 60हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. या स्मार्टफोनचे डायमेंशन 164.28×75.8×8.94एमएम तसेच वजन 188ग्राम आहे. हे देखील वाचा: 5G च्या गर्दीत 4G स्मार्टफोन! 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह Realme 10 4G ‘या’ दिवशी होणार लाँच

50 mp camera phone huawei nova y61 launched check price specifications details

Huawei Nova Y61 स्मार्टफोन Huawei Mobile Services (HMS) वर लाँच झाला आहे जी ईएमयुआय 12 सह चालते. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे परंतु चिपसेटचा खुलासा मात्र अजून झाला नाही. फक्त हुवावे नोवा वाय61 एक 4जी स्मार्टफोन असेल त्यामुळे यात 5जी कनेक्टिव्हिटी सपोर्ट मिळणार नाही हे निश्चित आहे.

फोटोग्राफीसाठी Huawei Nova Y61 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला एफ/2.4 अपर्चर असलेली मॅक्रो लेन्स तसेच तेवढ्याच अपर्चरचा असलेला डेप्थ सेन्सर मिळेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या हुवावे स्मार्टफोनमध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Huawei Nova Y61 ड्युअल सिमला सपोर्ट करतो ज्यात 3.5एमएम जॅक सोबतच अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी स्मार्टफोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन मिळतो. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 22.5वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 5G Supported Smartphones: या स्मार्टफोन्सवर वापरता येईल Airtel आणि Jio चं 5G; नवी यादी आली समोर

Huawei Nova Y61 Price

हुवावेनं सध्या Huawei Nova Y61 च्या किंमतीचा खुलासा केला नाही परंतु वेबसाइट लिस्टिंगनुसार हा फोन युरोपियन बाजारात 4 जीबी रॅमसह लाँच होईल. तर आशिया पॅसिफिकमध्ये 6 जीबी रॅमसह उपलब्ध होईल. फोनचे सर्व मॉडेल 64 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतील. Huawei Nova Y61 स्मार्टफोन Sapphire Blue, Mint Green आणि Midnight Black कलरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here