बॅटरी वाचवण्याच्या गुगलनं सांगितलेल्या 6 शानदार टिप्स, जाणून घ्या

स्मार्टफोनचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यामुळे बॅटरीच्या समस्या देखील वाढत आहेत. फोन डिस्चार्ज होण्याची तक्रार लोक वारंवार करत असतात. बऱ्याचदा लोकांना कमी बॅटरीमध्ये फोन दीर्घकाळ वापरण्याची पद्धत माहित नसते. बॅटरी वाचवण्याचे अनेक सल्ले तुम्हाला ऑनलाइन दिसले असतील. परंतु आज आम्ही तुम्हाला अँड्रॉइड बनवणाऱ्या कंपनी गुगलनं दिलेल्या टिप्स सांगणार आहोत. पुढे कमी बॅटरीसह जास्त वेळ अँड्रॉइड फोन वापरण्याच्या काही टिप्स देण्यात आल्या आहेत, ज्या स्वतः गुगलनं सांगितल्या आहेत.

1. बॅटरी सेव्हर करा चालू

बॅटरी पावर 15 टक्के होताच आपोआप बॅटरी सेव्हर ऑन होतो परंतु त्याआधीच जर तुम्ही हा मोड ऑन करू शकता. बॅटरी वेगानं संपत आहे असं वाटलं की बॅकअप टाइम वाढवण्यासाठी तुम्ही हा मोड ऑन करू शकता.

बॅटरी सेव्हर ऑन होताच फोनची स्क्रीनचा वरचा आणि खालच्या बाजूलाच नारंगी रंगात रूपांतरित होईल. सेव्हर ऑन होताच तुमच्या फोनमधील मॅप बंद होईल. तसेच व्हायब्रेशन, लोकेशन आणि बॅकग्राउंड डेटा मर्यादित केला जाईल. त्याचबरोबर ईमेल आणि मेसेज सेवेसह अन्‍य अनेक अ‍ॅप्लिकेशन अपडेट होणार नाहीत जोवर तुम्ही ते ओपन करत नाही. त्यामुळे बॅटरी बॅकअप खूप वाढतो.

बॅटरी सेव्हर मोड चालू करण्यासाठी सेटिंग मध्ये जा. इथे बॅटरीचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. त्यात बॅटरी सेव्हरचा ऑप्शन ऑन करा.

2. सतत कनेक्टिव्हिटी टाळा

इंटरनेटशी कनेक्ट केल्यावर तुमची बॅटरी झपाट्यानं संपू शकते. त्यामुळे बॅटरी कमी असल्यास, मोबाइल हॉटस्पॉट, दीर्घकाळ जीपीएसचा वापर, व्हिडीओ किंवा म्युजिक स्ट्रीम करणे आणि प्रवासात जास्त फोन कॉल करणे टाळावे. तसेच रोमिंग दरम्यान जास्त कॉल केल्यास देखील बॅटरी वेगानं डिस्चार्ज होते.

3. वारंवार स्क्रीन ऑन करू नका

गुगलनुसार, जर तुम्हाला बॅटरी लाइफ वाढवायची असेल तर वारंवार स्क्रीन ऑन करू नका. कारण सर्वात जास्त बॅटरीचा वापर डिस्प्ले द्वारे होतो. जेव्हा कमी बॅटरीमध्ये फोन दीर्घकाळ वापरायचा असेल तर व्हिडीओ आणि वजनदार ग्राफिक्स असलेल्या गेमचा वापर कमी करा.

4. जास्त प्रोसेसिंग टाळा

गुगलनुसार, बॅटरीचा वापर जास्त काळ करण्यासाठी तुम्ही कॅमेऱ्याचा जास्त वापर करू नका किंवा सतत एखादं अ‍ॅप्लिकेशन वापरू नका.

5. कनेक्टिव्हिटी मर्यादित ठेवा

जर बॅटरी खूप कमी असेल तर फोन एरोप्लेन मोडमध्ये ठेवा. कारण फोन ऑन करण्यात जास्त बॅटरी खर्च होते. कमजोर नेटवर्क क्षेत्रात देखील मोबाइलचा वापर करत नसल्यास एरोप्लेन मोडवर ठेवणं उत्तम. त्यामुळे तुमचा डिवाइस नेटवर्क शोधण्यासाठी आणि कनेक्ट होण्यासाठी बॅटरी वापरत नाही.

6. वायफायचा वापर

वायफायचा वापर करायचा असेल तर तो देखली ऐरोप्लेन मोडमध्ये करा. त्यामुळे बॅटरी कमी संपेल आणि तुमचं काम देखील होईल. तसेच ब्लूटूथ बंद ठेवणं उत्तम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here