हे आहेत एयरटेल प्रीपेड यूजर्स साठी बेस्ट प्लान, ज्यात डेटा सोबत मिळते कॉलिंग फ्री

airtel च्या ऑफिस समोरील व्यक्ती

जर तुम्ही एयरटेल यूजर असाल आणि तुमच्यासाठी एखादा बेस्ट प्लान शोधत असाल ज्यात कॉलिंग, मेसेजिंग आणि डेटा पण मिळेल तर तुमच्यासाठी 4 प्लान बेस्ट आहेत ज्यांची माहित आम्ही खाली दिली आहे. खाली दिलेली प्लान संपूर्ण भारतातील एयरटेल च्या प्रीपेड यूजर्स साठी आहेत. या प्लान मध्ये भरपूर 2जी, 3जी आणि 4जी डेटा सह कॉलिंग फ्री आहे.

एयरटेल 199 प्लान
हा एयरटेल चा मासिक प्लान आहे. 199 रुपयांच्या या प्लान मध्ये तुम्हाला रोज 1.4जीबी डेटा मिळेल. एयरटेल चा हा प्लान 28 दिवसांसाठी वैध आहे. या प्लान अंतर्गत अनलिमिटेड कॉलिंग फ्री आहे आणि तुम्ही फ्री इनकमिंग आणि आउट गोइंग रोमिंग कॉल्सचा लाभ घेऊ शकता. याचबरोबर तुम्हाला रोज 100 एसएमएस मोफत मिळतील. खास बाब म्हणजे या प्लानचा वापर 2जी, 3जी आणि 4जी सहित कोणत्याही डिवाइस वर केला जाऊ शकतो.

एयरटेल 399 प्लान
एयरटेल के 399 रुपयांच्या प्लान मध्ये डेटा बेनिफिट खूप चांगले आहेत. या प्लानची वैधता 70 दिवस आहे आणि या प्लान मध्ये तुम्हाला रोज 1.4जीबी डेटा मिळेल. म्हणजेच तुम्ही 70 दिवसांत 98जीबी डेटा वापरू शकाल. डेटा सोबत सर्व लोकल आणि एसटीडी कॉलिंग यात मोफत आहे. तसेच रोमिंग मध्ये पण इन कमिंग किंवा आउट गोइंग कॉल वर कोणताही चार्ज लागणार नाही . या प्लान मध्ये रोज तुम्हाला 100 एसएमएस मोफत मिळतील. एयरटेल च्या या प्लानचा लाभ पण तुम्ही 2जी, 3जी आणि 4जी फोन वर घेऊ शकता.

एयरटेल 448 प्लान
जर तुम्ही एखादा जास्त चालणार प्लान शोधात असाल तर एयरटेल चा 448 रुपयांचा प्लान तुम्ही घेऊ शकता. एयरटेलचा 448 रुपयांच्या प्लानची वैधता 82 दिवस आहे आणि या प्लान मध्ये पण तुम्हाला रोज 1.4 जीबी डेटा मिळेल. अर्थात 82 दिवसांत तुम्ही 114.8जीबी डेटा वापरू शकता. प्लान मध्ये सर्व नॅशनल कॉलिंग सहित रोमिंग मध्ये पण इन कमिंग किंवा आउट गोइंग कॉल वर कोणताही चार्ज लागणार नाही. सोबतच रोज तुम्हाला 100 एसएमएस मोफत मिळतील.

एयरटेल 509 प्लान
एयरटेल कडे संपूर्ण तीन महिन्यांचा पण एक प्लान आहे ज्याची किंमत 509 रुपये आहे . एयरटेलच्या 509 रुपयांच्या प्लानची वैधता 90 दिवस आहे आणि यात तुम्हाला रोज 1.4जीबी डेटा मिळेल. संपूर्ण प्लान मध्ये तुम्ही एकूण 126जीबी डेटा वापरू शकाल. कंपन च्या अन्य प्लान प्रमाणे यात पण लोकल आणि नॅशनल कॉलिंग फ्री असेल. त्याचबरोबर रोज तुम्हाला 100 एसएमएस पण दिले जातील. विशेष म्हणजे एयरटेलचा हा प्लान सर्व 2जी, 3जी आणि 4जी प्रीपेड यूजर साठी उपलब्ध आहे.

एयरटेल प्रीपेड यूजर्सनी कसा करावा बॅलेन्स चेक

जर तुम्ही एयरटेल प्रीपेड यूजर असाल आणि तुमच्या नंबरचा बॅलेन्स आणि वैधता बघायची असेल तर तुम्हाला तुमच्या फोन वरून *121# डायल करावे लागेल. त्यामुळे फोन वर तुमच्या नंबर संबंधित माहिती येईल. जसे कि माय आॅफर, डेटा आॅफर आणि टॉक टाइम आॅफर इत्यादी. तुम्हाला हवी तेव्हा तुम्ही हि माहिती मिळवू शकता. तसेच 121 वर कॉल करून पण माहिती मिळवता येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here