BSNL चे डेली 2GB Data देणारे Prepaid Plan, कमी खर्चात मिळतील जास्त बेनिफिट्स

Highlights

  • 500 रुपयांच्या आत येणारे बीएसएनएलचे प्लॅन्स देतात रोज 2GB डेटा
  • कंपनीनं एकूण चार प्लॅन्स केलेत सादर
  • मोफत कॉलिंग देखील मिळतेय

सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) कडे असे अनेक प्लॅन (Prepaid Recharge Plan) आहेत जे कमी किंमतीत जास्त बेनिफिट्ससह येतात. तसेच, BSNL प्रायव्हेट कंपन्यांना चांगली टक्कर देण्यासाठी नेहमीच आपले नवीन प्लॅन लाँच करत असते. जर तुम्ही देखील BSNL Sim Users असाल तर आम्ही तुमच्यासाठी आज बीएसएनएलचे काही असे प्रीपेड प्लॅन (BSNL Data Plans and Net Packs) घेऊन आलो आहोत जे डेली 2GB डेटासह येतात.

BSNL Daily 2GB Data Recharge

  • BSNL STV Rs 97
  • BSNL Voice Rs 187
  • BSNL STV Rs 347
  • BSNL STV Rs 395
  • BSNL STV Rs 499

1. BSNL चा 97 रुपयांचा प्लॅन

बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज 2जीबी मोबाइल डेटा दिला जात आहे. रिचार्जमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच ग्राहकांना रोज 100 एसएमएस देखील दिले जात आहेत. तसेच प्लॅनची वैधता 18 दिवस आहे. अशाप्रकारे ग्राहकांना एकूण 36GB डेटा मिळतो. तसेच, डेटा कोटा संपल्यावर इंटरनेट स्पीड 80Kbps होतो. हे देखील वाचा: ऑनलाईन फसवणूक आणि Cyber Crime ची तक्रार पोलीस स्टेशनला न जात कशी करायची? जाणून घ्या

2. BSNL चा 187 रुपयांचा प्लॅन

बीएसएनएलचा 187 रुपयांचा प्लॅन पाहता या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह अनलिमिटिड लोकल, एसटीडी आणि रोमिंग व्हॉइस कॉल, डेली 2 जीबी हाय-स्पीड डेटा आणि डेली 100 एसएमएसची सुविधा मिळते. तसेच या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी PRBT अ‍ॅक्सेस देखली मिळतो. डेटा कोटा संपल्यावर इंटरनेट स्पीड कमी होऊन 40Kbps होतो.

3. BSNL चा 347 रुपयांचा प्लॅन

347 रुपयांच्या के बीएसएनएल प्लॅन बद्दल बोलायचं झालं तर यात देखील अनलिमिटिड व्हॉइस कॉलिंग, 100 डेली एसएमएस आणि डेली 2 जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. हा प्लॅन 56 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. या प्लॅनमध्ये Challenges Arena Mobile Gaming सर्व्हिस 56 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. तसेच डेटा कोटा संपल्यावर इंटरनेट स्पीड कमी होऊन 80Kbps होतो. तसेच, अनलिमिटिड कॉलिंग बेनेफिट दिल्ली-मुंबईत देखील मिळेल.

4. BSNL चा 395 रुपयांचा प्लॅन

बीएसएनएलच्या या रिचार्ज प्लॅनची किंमत 395 रुपये आहे. या प्लॅनमध्ये 71 दिवसांची वैधता मिळेल. तसेच या प्लॅनमध्ये डेली 2GB डेटा मिळत आहे. डेली डेटा लिमिट ओव्हर झाल्यानंतर स्पीड 40 kbps केला जाईल. बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 3000 मिनिटे BSNL to BSNL व्हॉइस कॉल्स (लोकल/नॅशनल ) सह 1800 मिनिटे BSNL to Other Voice Calls (लोकल/नॅशनल) मिळतात. फ्री मिनिट्स संपल्यावर 20 पैसे प्रति मिनिट चार्ज द्यावा लागेल. हे देखील वाचा: ऑनलाइन सेलमध्ये अशाप्रकारे मिळवा Best Deal; हजारो रुपयांची बचत करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा

5. BSNL चा 499 रुपयांचा प्लॅन

BSNL च्या 499 रुपयांचा प्लॅनमध्ये 90 दिवसाची वैधता मिळत आहे. तसेच प्लॅनमध्ये रोज 2GB डेटा मिळतो. म्हणजे 90 दिवसांत एकूण 180GB डेटाचा वापर करण्यासाठी मिळेल. जर तुम्ही 2GB डेली डेटा लिमिट संपवली तर तुम्हाला 40 kbps स्पीड मिळेल. यात अनलिमिटेड कॉलिंगसह फ्री नॅशनल रोमिंग सर्व्हिस देखील दिली जात आहे. तसेच युजर्सना रोज 100 SMS, PRBT सर्व्हिस आणि जिंक म्यूजिक सर्व्हिस फ्री मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here