BSNL युजर्सना 100 रुपयांमध्ये मिळेल फुल टॉकटाइम, Jio-Airtel कडे पण नाही असा बेजोड प्लान

BSNL

सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL प्राइवेट कंपन्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी आपली एक शानदार ऑफर घेऊन आली आहे. या ऑफरच्या मदतीने कंपनी आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना टक्कर देण्यासोबतच आपल्या ग्राहकांना खुश करण्याचे प्रयत्न करत आहे. यात कंपनीने सर्व सर्किलसाठी आपल्या प्रीपेड मोबाईल ग्राहकांसाठी 100 रुपयांच्या टॉप अपवर फुल टॉक टाइम ऑफर लॉन्च केली आहे. हि फुल टॉक टाइम ऑफर 20 ऑगस्ट 2021 पर्यंत सर्व टेलीकॉम सर्कल्समध्ये बीएसएनएल प्रीपेड मोबाईल ग्राहकांसाठी उपलब्ध होईल. म्हणजे जर तुमच्याकडे जवळपास तीन महिन्याचा वेळ आहे या ऑफरचा फायदा घेण्यासाठी.

खाजगी कंपन्यांना आव्हान

BSNL या ऑफरच्या माध्यमातून प्राइवेट कंपनी जसे कि जियो, एयरटेल आणि वोडाफोन आयडियाला चांगले आव्हान देत आहे. सध्या खाजगी ऑपरेटर आपल्या ग्राहकांना कोणताही टॉप-अप आणि फुल टॉकटाइम देत नाहीत. पण महामारीच्या काळात हि ऑफर आल्यानंतर बीएसएनएल ग्राहकांना दिलासा मिळेल.

BSNL

BSNL देत आहे फ्री 100 कॉलिंग मिनट आणि अतिरिक्त वैधता

BSNL ने काही दिवसांपूर्वी कोविड 19चा प्रभाव पाहून भारतात मोफत वॅलिडिटी एक्सटेंशन आणि फ्रीमध्ये 100 मिनट कॉलिंग बेनेफिट देण्याची घोषणा केली होती. BSNL ने अलीकडेच माहिती दिली आहे कि प्रभावित प्रीपेड सब्सक्राइबर्सच्या प्लानची वैधता 31 मे पर्यंत वाढत आहे. याचा अर्थ असा कि कोणत्याही रिचार्जविना युजर्सना 2 महीने फ्री सेवा मिळेल.

या एक्सटेंशनसाठी युजर्सना एक पण रुपया द्यावा लागणार नाही. वॅलिडिटी एक्सटेंशन व्यतिरिक्त युजर्सना 100 मिनिटं फ्री कॉलिंग बेनेफिट्स मिळेल. जर तुमचा प्लान 1 एप्रिल किंवा त्यानंतर संपल्यावर तुम्हाला दोन महीने मोफत कॉलिंग मिळेल.

या प्लानमध्ये मिळेल जास्त वैधता

BSNL च्या PV107, PV197 आणि PV397 च्या तीन प्रीपेड प्लान्सची वैधता वाढवण्याची पण घोषणा केली आहे. कंपनीने या प्लान्सची वैधता 31 मे, 2021 पर्यंत मोफत वाढवली जाईल. यामुळे ग्राहकांच्या फोनवर इनकमिंग कॉल्स येत राहतील. ज्यांचे प्लान्स 1 एप्रिल 2021 ला संपले आहेत त्यांना फ्री वॅलिडिटी एक्सटेंशन दिला जात आहे.

सोर्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here