BSNL ने रिवाइज केला हा प्लान, जियो आणि वोडाफोनला मिळेल टक्कर

टेलीकॉम क्षेत्रात वाढती स्पर्धा पाहून भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) काही दिवसांपासून आपले शानदार प्लान लॉन्च करत आहे. नुकताच कंपनीने आपला नवा Abhinandan-151 प्रीपेड प्लान सादर केला होता. तर आता हा प्लान रिवाइज केला आहे. हा प्लान कंपनीने जून मध्ये लॉन्च केला होता, ज्यात यूजर्सना कॉलिंग, डेटा आणि एसएमएस चा लाभ देण्यात होते. आता कंपनीने प्लानची डेटा लिमिट वाढवली आहे. पण कॉलिंग आणि एसएमएस च्या सुविधेत कोणताही बदल झाला नाही.

अभिनंदन-151 प्रीपेड प्लान मध्ये आधी यूजर्सना 24 दिवसांच्या वैधतेसह रोज 1जीबी डेटा दिला जात होता. आता या प्लान मध्ये यूजर्सना रोज 1.5जीबी डेटा दिला जाईल. याची माहिती कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून दिली आहे. तसेच या प्लान मध्ये तुम्हाला रोज 100 फ्री एसएमएस सोबत अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलिंगचा फायदा पण मिळेल. याची खास बाब अशी कि रोमिंग कॉलिंग बेनिफिट मुंबई आणि दिल्ली सर्कल मध्ये पण चालेल.

हे देखील वाचा: Vivo V15 Pro च्या किंमतीत झाली 3,000 रुपयांची कपात, जाणून घ्या नवीन किंमत

या प्लानची वैधता 180 दिवस आहे. पण प्लान मध्ये मिळणारे फ्री फायदे 24 दिवस वैध राहतील. बीएसएएल चा हा प्लान 90 दिवसांच्या प्रमोशनल पीरियड साठीच मार्केट मध्ये उपलब्ध असेल. जर तुम्हाला पण हा प्लान ऍक्टिव्हेट करायचा आले तर यासाठी PLAN 151 टाइप करून 123 वर मेसेज पाठवावा लागेल. यानंतर तुम्हाला हा प्लान उपलब्ध होईल.

कंपनीने लाईकडेच दोन प्लान्स सादर केले होते. यात सर्वात आधी बोलूया 1,399 रुपयांच्या प्लान बद्दल, या प्लान मध्ये यूजर्सना सर्व नेटवर्क वर अनलिमिटेड फ्री वॉयस कॉलिंगचा लाभ मिळेल. त्याचबरोबर यूजर्सना प्लान मध्ये प्रतिदिन 1.5GB डेटा आणि 50 एसएमएस मिळतील. या प्लानची वैधता 270 दिवस आहे. लक्षात असू द्या कि हा प्लान 90 दिवसांच्या प्रमोशनल पीरियड साठी सादर केला गेला आहे. ग्राहक या प्लानचा रिचार्ज 25 जुलै 2019 पासून करू शकतील.

हे देखील वाचा: 4,000एमएएच बॅटरी आणि तीन रियर कॅमेऱ्यांसह लॉन्च झाला Huawei Y9 Prime, कुठे आणि केव्हा होईल सेल जाणून घ्या

दुसरा प्लान पाहता 1,000 रुपयांच्या प्रीपेड प्लान मध्ये पण यूजर्सना फ्री अनलिमिटेड वॉयस कॉलिंगचा लाभ मिळेल. तसेच प्लान मध्ये संपूर्ण वैधत्यासाठी 90GB का डेटा दिला जाईल. 1,399 रुपयांच्या प्लान प्रमाणे या प्लानची वैधता पण 270 दिवस आहे. तसेच संपूर्ण वैधते साठी ग्राहकांना या प्लान सह 750एसएमएस मिळतील.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here