काही दिवसांपूर्वी आम्ही माहिती दिली होती कि Vivo ने V15 आणि V15 Pro मॉडेलची निर्मिती बंद केली आहे आणि कंपनी लवकरच यांची किंमत कमी करणार आहे. तेव्हा कंपनीने याला नकार डायल होता पण आता जवळपास शिकामोर्तब केला आहे. आज Vivo V15 Pro प्रो च्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. कंपनीने याची किंमत 3,000 रुपये कमी केली आहे. आता प्राइस कट फक्त 6जीबी मॉडेल वरच उपलब्द आहे. आधी हा फोन 26,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होता पण आज पासून हा 23,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. अजूनपर्यंत कंपनीने याची अधिकृत माहिती दिली नाही पण ऑफलाइन स्टोर वरून आम्हाला हि माहिती मिळाली आहे. इतकेच नाही तर ऑनलाइन स्टोर फ्लिपकार्ट वर पण नवीन किंमत अपडेट करण्यात आली आहे.
Vivo V15 सीरीज कंपनीने यावर्षी मार्च मध्ये लॉन्च केली होती आणि हा वीवोचा खूप प्रसिद्ध मॉडेल आहे. या फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह पॉपअप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. सोबतच फोनची डिजाइन आणि इतर फीचर्स पण ऑफलाइन स्टोरनुसार खूप चांगले आहेत. त्यामुळे लोकांनी हा हातोहात घेतला. परंतु काही दिवसांपूर्वी आम्ही माहिती दिली होती कि कंपनी Vivo V17 सीरीजचा भारतात लॉन्च करण्याची तयारी करत आहे. त्यामुळे जुन्या मॉडेल्सच्या किंमतीत कपात केली जाऊ शकतात. Vivo V15 Pro ची किंमत दुसऱ्यांदा कमी करण्यात आली आहे. याआधी मे मध्ये कंपनीने प्राइस ड्रॉप केली होती. भारतीय बाजारात या फोन मध्ये 28,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता पण मे मध्ये कंपनीने 2,000 रुपयांची कपात केली होती आणि हा 26,990 रुपयांमध्ये उपलब्ध झाला होता. तर आता 3,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे.
हे देखील वाचा: 4,000एमएएच बॅटरी आणि तीन रियर कॅमेऱ्यांसह लॉन्च झाला Huawei Y9 Prime, कुठे आणि केव्हा होईल सेल जाणून घ्या
Vivo V15 Pro चे स्पेसिफिकेशन
Vivo V15 Pro कंपनी ने ग्लास फिनिश मध्ये सादर केला आहे जो समोरून पूर्णपणे बेजल फ्री आहे. कंपनी ने हा 19.5:9 आसपेक्ट रेशियो सह सादर केला आहे आणि यात 6.39—इंचाचा फुल एचडी+ (1080 x 2316 पिक्सल रेजल्यूशन) स्क्रीन देण्यात आली आहे. खास बाब अशी कि फोन मध्ये सुपर एमोलेड स्क्रीन पॅनलचा वापर केला गेला आहे जो चांगल्या डिस्प्ले साठी ओळखला जातो.
हा फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालतो आणि फोन मध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर (2×2.0 गीगाहट्र्ज क्रयो 460 गोल्ड आणि 6×1.7 गीगाहट्र्ज क्रयो 460 सिल्वर) देण्यात आला आहे. हा क्वालकॉमचा नवीन प्रोसेसर आहे जो शानदार प्रोसेसिंग साठी ओळखला जातो. तसेच कंपनी ने हा 6जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी सह सादर केला आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,700 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन वीवोच्या फनटच ओएस वर चालतो जो एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 9 पाई वर आधारित आहे.
हे देखील वाचा: आज पासून सुरु झाली Vivo S1 ची प्री बुकिंग, मिळत आहे 2,500 रुपयांपर्यंतची कॅश बॅक ऑफर
Vivo V15 Pro चा कॅमेरा
फोटोग्राफीच्या बाबतीत पण हा फोन शानदार आहे. याचा सेल्फी कॅमेरा 32—मेगापिक्सलचा आहे जो एफ/2.0 अपर्चर सह येतो. तसेच मागील पॅनल वर तीन कॅमेरा सेंसर आहेत ज्यात मेन सेंसर 48—मेगापिक्सलचा (12 X 4) आहे जो एफ/1.8 अपर्चर सह येतो. पण यात पिक्सल बिनिंग टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला आहे ज्यात 12एमपी चा सेंसर आहे जो 48एमपी वर फोटो घेऊ शकतो. तसेच दुसरा सेंसर 8—मेगापिक्सलचा आहे जो वाइड एंगल साठी आहे तर तिसरा सेंसर 5—मेगापिक्सलचा देण्यात आला आहे आणि हा डेफ्थ सेंसिंगचे काम करतो. एकंदरीत कॅमेरा सेग्मेंट खुफ पावरफुल आहे.
सिक्योरिटी साठी या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच फेस अनलॉकला पण सपोर्ट आहे. राहील प्रश्न पावर बॅकअपचा तर कंपनीने हा 3,700एमएएच च्या बॅटरी सह सादर केला आहे.
Vivo V15 Pro वीडियो

















