4,000एमएएच बॅटरी आणि तीन रियर कॅमेऱ्यांसह लॉन्च झाला Huawei Y9 Prime, कुठे आणि केव्हा होईल सेल जाणून घ्या

Huawei ने आज अधिकृतपणे भारतात आपला पहिला पॉप-अप सेल्फी कॅमेरा स्मार्टफोन Y9 Prime (2019) लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन गेल्या वर्षी लॉन्च केल्या गेलेल्या Y9 Prime (2018) चा अपग्रेडेड वर्जन आहे. तसेच हा ब्रँडचा दुसरा फोन आहे, ज्यात पॉप-अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. याआधी कंपनीने आपला पहिला पॉप-अप सेल्फी असलेला फोन P Smart Z सादर केला होता.

किंमत

याआधी कंपनीने फोन सर्व स्पेसिफिकेशन्स सह आपल्या इंडियन वेबसाइट वर लिस्ट केला होता. तसेच फोन कंपनीने 15,990 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. ग्राहक ई-कॉमर्स साइट अमेझॉन इंडिया वरून 7 ऑगस्टला हँडसेट विकत घेऊ शकतील. डिवाइस दोन कलर वेरिएंट-ब्लू आणि ग्रीन कलर मध्ये सादर केला गेला आहे. अमेझॉन इंडिया वर नो कोस्ट ईएमआई व 15000 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळेल. तसेच 5 ऑगस्ट पासून ऑफलाइन स्टोर्स वर फोन प्री-बुक करता येईल.

हे देखील वाचा: आज पासून सुरु झाली Vivo S1 ची प्री बुकिंग, मिळत आहे 2,500 रुपयांपर्यंतची कॅश बॅक ऑफर

डिजाइन

फोनच्या बॅक पॅनल वर डावीकडे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. दोन कॅमेरा सेंसर एकाच सर्कल मध्ये आहेत तर तिसरा कॅमेरा सेंसर थोडा खाली देण्यात आला आहे. कॅमेरा सेटअपच्या खाली फिंगरप्रिंट सेंसर पण आहे. Huawei Y9 Prime च्या बॅक पॅनल फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. फ्रंट पॅनल मध्ये कोणतीही नॉच नाही.

Huawei Y9 Prime (2019) चे स्पेसिफिकेशन्स

Huawei Y9 Prime (2019) पाहता यात 6.59-इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 1,080 x 2,340 पिक्सल आहे. तसेच फोन मध्ये हाईसिलिकॉन किरिन 710 चिपसेट आणि माली-जी51 एमपी4 जीपीयू देण्यात आला आहे. यासोबत फोनच्या दोन मध्ये वेरिएंट-4जीबी रॅम+ 64जीबी आणि 4जीबी रॅम+ 128जीबी स्टोरेज आहे. डिवाइस ईएमयूआई बेस्ड एंडरॉयड 9.0 पाई वर आधारित आहे. यासोबतच फोन मध्ये रियर-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.

हे देखील वाचा: Samsung Galaxy A सीरीजच्या 9 स्मार्टफोन्सचे झाले पेटेंट फाईल, बघा यांची नावे

फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास Huawei Y9 Prime (2019) मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. हँडसेटच्या मागे 16-मेगापिक्सल एफ/1.8 प्राइमरी कॅमेरा, 8-मेगापिक्सल अल्ट्रा वाइड-एंगल लेंस आणि 2-मेगापिक्सल एफ/2.4 डेप्थ सेंसिंग यूनिट आहे. तसेच फोनच्या फ्रंटला 16-मेगापिक्सल पॉप-अप शूटर सेल्फी आहे. सोबतच फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here