4 कलर वेरिएंट मध्ये लॉन्च होईल आॅनर 9एन, फ्लिपकार्ट वर होईल एक्सक्लूसिव सेल

टेक कंपनी आॅनर भारतीय बाजारात आपला नवीन नॉच डिस्प्ले वाला स्टाइलिश स्मार्टफोन आॅनर 9एन लॉन्च करणार आहे. कंपनी ने फोन लॉन्च साठी मीडिया इन्वाईट पण पाठवले आहेत. आॅनर 9एन 24 जुलै ला भारतीय बाजारात सादर करेल. फोन लॉन्च आधी आता आॅनर 9एन च्या कलर वेरिएंट ची माहिती समोर आली आहे. कंपनी शी संबधित सुत्रांनी 91मोबाईल्स ला आॅनर 9एन च्या कलर वेरिएंट ची माहिती दिली आहे. त्याचबरोबर हा फोन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर पण वेबपेज स्वरुपता लिस्ट करण्यात आला आहे.

आॅनर 9एन भारतात ब्लॅक, ब्लू, ग्रीन आणि पर्पल कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन स्पेसिफिकेशन्स मध्ये जेवढा दमदार आहे याचा लुक आणि डिजाईन पण तेवढीच स्टाईलिश आहे. आम्हाला मिळालेल्या फोटोज मध्ये फोन चा बॅक पॅनल दाखविण्यात आला आहे जो खूपच शाइनी आणि ग्लॉसी वाटतो. तर दुसरीकडे लॉन्च च्या आधी फ्लिपकार्ट वर आॅनर 9एन चा वेबपेज बनवण्यात आला आहे. या वेबपेज वरून स्पष्ट झाले आहे की आॅनर 9एन फ्लिपकार्ट एक्सक्लूसिव असेल तसेच 24 जुलै दुपारी 11 वाजून 30 मिनिटांनी होणार्‍या लॉन्च ची माहिती पण मिळाली आहे.

आॅनर 9एन चीन मध्ये आॅनर 9आय (2018) म्हणून लॉन्च झाला आहे. याचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन मेटल फ्रेम वर बनला आहे ज्याचा बॅक पॅनल मिरर फिनिशिंग वाला आहे. कंपनी ने हा फोन 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5.84-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह सादर केला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. हा फोन एंडरॉयड 8.0 ओरियो आधारित ईएमयूआई 8.0 सह सादर करण्यात आला आहे सोबत हा हाईसिलिकॉन किरीन 659 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने या फोन मध्ये 4जीबी रॅम दिला आहे सोबत ग्राफिक्स साठी माली टी830-एमपी2 जीपीयू आहे. आॅनर 9एक्स/आॅनर 9आय (2018) 64जीबी तसेच 128जीबी च्या दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हा फोन डुअल रियर कॅमेरा ला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे दोन रियर कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

आॅनर 9एन/आॅनर 9आय (2018) डुअल सिम सह वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक टेक्निक ला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. चीनी बाजारात आॅनर 9एन/आॅनर 9आय (2018) चा 64जीबी वेरिएंट 1,399 युआन (जवळपास 14,600) तसेच 128जीबी मेमरी वेरिएंट 1,699 युआन (जवळपास 17,800) च्या किंमतीत ब्लॅक, ब्लू, ग्रीन व पर्पल कलर वेरिएंट मध्ये लॉन्च झाला आहे. भारतात फोन ची किंमत किती असेल यासाठी 24 जुलै ची वाट बघितली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here