Jio आणि BSNLच्या 90 दिवसांच्या प्रीपेड प्लॅनची तुलना

BSNL Vs Jio Recharge Plan: Akash Mukesh Ambani च्या टेलीकॉम कंपनी Reliance Jio (रिलायन्स जियो) नं काही दिवसांपूर्वी आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला होता, ज्यात अनलिमिटेड कॉलिंग, ओटीटी सब्सक्रिप्शन आणि 2GB डेली डेटासह 90 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. या प्लॅनची किंमत फक्त 749 रुपये आहे. तसेच, या Recharge Plan ला टक्कर देण्यासाठी BSNL नं 769 रुपये (BSNL STV769) चा प्लॅन सादर केला आहे, ज्यात जवळपास जियो सारखे लाभ मिळतात. दोन्ही प्लॅनची किंमत जवळपास आसपास आहे आणि दोन्ही प्लॅनमध्ये 90 Days Validity मिळते. यासाठी आम्ही या आर्टिकलमध्ये दोन्ही प्लॅनची तुलना करत आहोत त्यामुळे तुम्हाला कोणत्या प्लॅनमध्ये तुम्हाला जास्त फायदा मिळेल हे समजेल. चला जाणून घेऊया.

Jio चा 749 रुपयांचा प्लॅन

jio 5g works on 4g sim

  • 90 दिवसांच्या कालावधीत या रिचार्ज प्लॅनमध्ये डेली 2GB डेटा दिला जात आहे. म्हणजे संपूर्ण वैधतेत युजर्सना एकूण 180जीबी डेटा वापरता येईल.
  • डेली डेटा लिमिट संपल्यावर जियो युजर्सना 64Kbps स्पीड वर अनलिमिटेड डेटा मिळत राहील.
  • ग्राहकांना या Plan मध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग फ्री दिली जात आहे. डेली डेटा आणि फ्री कॉलिंग सोबतच या प्लॅनमध्ये ग्राहकांना डेली 100 FREE SMS देखील मोफत मिळत आहेत.
  • इतकेच नव्हे तर प्लॅनसह Jio अ‍ॅप्ससाठी कॉम्प्लिमेंट्री सब्सक्रिप्शन दिलं जात आहे, ज्यामुळे युजर्स कुठेही आणि कधीही हे अ‍ॅप्स वापरू शकतील.

BSNL चा 769 रुपयांचा प्लॅन

  • या प्लॅनमध्ये युजर्सना 90 दिवसांची वैधता मिळत आहे, यात रोज 2GB डेटा ऑफर केला जात आहे. म्हणजे संपूर्ण तीन महिन्यांच्या कालावधीत युजर्सना एकूण 180जीबी डेटा वापरता येईल.
  • या Plan मध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग फ्री दिली जात आहे. डेली डेटा आणि फ्री कॉलिंग सोबतच या प्लॅनमध्ये ग्राहकांना डेली 100 SMS फ्री मिळतील.
  • इतकेच नव्हे तर प्लॅनसह ओटीटी अ‍ॅप्सचे कॉम्प्लिमेंट्री सब्सक्रिप्शन दिले जात आहे, ज्यांचा वापर युजर्स कधीही करू शकतात.
  • या प्लॅनमध्ये Eros Now एंटरटेनमेंट, Lystn Podcast सर्व्हिस, Hardy मोबाइल गेम सर्व्हिस, Lokhdhun, Zing चं फ्री सब्सक्रिप्शन मिळत आहे.

निष्कर्ष: जर तुम्ही एक दीर्घ वैधता असलेला प्लॅन शोधत असाल तर दोन्ही कंपन्यांचे प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट आहेत. परंतु कमी किंमतीत जास्त डेटा आणि समान बेनिफिट्ससह इथे जियोचा प्लॅन विजयी ठरतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here