Citroen C3 भारतीय लाँचची जोरदार तयारी; मिळणार 30.2kWh चा बॅटरी पॅक

जर तुम्ही एक नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडा वेळ थांबणं तुमच्यासाठी योग्य ठरू शकतं. आता बातमी आली आहे की Citroen eC3 भारतीय बाजारात 2023 ला लाँच केली जाऊ शकते जी एक एंट्री-लेव्हल हॅचबॅक इलेक्ट्रिक कार असेल. तसेच Citroen eC3 ची किंमत कमी ठेवण्यासाठी फ्रेंच कंपनी ही कार भारतात असेंबल करणार आहे. या ई-कारमध्ये 30.2kWh चा बॅटरी पॅक असेल, ज्यामुळे हिला ड्राईव्हिंग रेंज जास्त मिळू शकते.

Citroen eC3 ची किंमत

लुकच्या बाबतीत Citroen eC3 कंपनीच्या पेट्रोल व्हर्जन Citroen C3 प्रमाणेच असेल. परंतु ई-कारमध्ये काही प्रीमियम बदल केले जाऊ शकतात. तसेच हिची किंमत 12-13 लाख रुपयांच्या आसपास असू शकते त्यामुळे आशा आहे की या बॅटरी असलेल्या कारला Tata Tigor EV कडून टक्कर मिळेल. हे देखील वाचा: सर्वात कमी किंमतीत 600GB डेटा आणि 12 महिने चालणारा BSNL चा प्लॅन; Jio-Airtel ची बोलती बंद

Citroen eC3 पुढील वर्षी होणार लाँच

Citroen च्या सिनियर मॅनेजर्सनी माहिती दिली आहे की C3 इलेक्ट्रिक पुढील वर्षी जानेवारीमध्ये लाँच होईल. परंतु कंपनीनं अद्याप या कारची वैशिष्ट्यांचा खुलासा केला नाही. अशी चर्चा आहे की C3 EV मध्ये 30.2kWh चा बॅटरी पॅक मिळेल जो जवळपास 300 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त रेंज सिंगल चार्जमध्ये देऊ शकते. ही कार एकापेक्षा जास्त बॅटरी पॅकच्या ऑप्शन्ससह बाजारात येऊ शकते.

या ईव्ही कारमध्ये 136 बीएचपीची पावर आणि 260 एनएमचा टॉर्क निर्माण करणारी इलेक्ट्रिक मोटर असण्याची शक्यता आहे. ही कार काही दिवसांपूर्वी भारतीय रस्त्यांवर चाचणीदरम्यान दिसली होती. कारच्या पुढील फेंडरवर कॅमोफ्लाज लावण्यात आले होते. ज्यामुळे चार्जिंग पोर्ट झाकला गेला होता. ही कार ICE C3 वर आधारीत असू शकते कारण साइड प्रोफाइल आणि डिजाईन हे आयसीई सारखे आहे. मात्र, कार नियमित मॉडेलपेक्षा वेगळी दिसावी यासाठी कंपनी काही कॉस्मेटिक बदल करू शकते. हे देखील वाचा: 12GB RAM आणि 120W चार्जिंगसह होणार iQOO Neo 7 5G ची भारतात एंट्री; वेबसाइटवर झाला लिस्ट

बाजारात असलेल्या ICE C3 मध्ये क्रुझ कंट्रोल, रिअर वायपर्स, रिअर डिफॉगर, ओआयव्हीएमसाठी मॅन्युअल अ‍ॅडजेस्टमेंट असे मूलभूत फीचर्स नाहीत, जे इलेक्ट्रिक कारमध्ये दिले जाऊ शकतात. कारमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कार प्लेसह १० इंचचा टच स्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, हाइट अ‍ॅडजस्टेबल ड्राइव्हर सीट, चार स्पिकर्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्टिअरिंग माउंटेड ऑडिओ कंट्रोल्स मिळण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here