सर्वात कमी किंमतीत 600GB डेटा आणि 12 महिने चालणारा BSNL चा प्लॅन; Jio-Airtel ची बोलती बंद

जर तुम्ही बीएसएनएल प्रीपेड युजर्स असाल आणि एखाद्या दीर्घ वैधता असलेला प्लॅन शोधत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आम्ही आज या आर्टिकलमध्ये तुम्हाला BSNL (Bharat Sanchar Nigam Limited) च्या एका लॉन्ग-टर्म प्रीपेड रिचार्जची माहिती देणार आहोत, जी पाहून Airtel-Jio युजर्सना धक्का बसेल. पुढे आम्ही तुम्हाला सरकारी टेलीकॉम कंपनीच्या ज्या प्लॅनची माहिती देणार आहोत त्यात फ्री डेटा, कॉलिंग, एसएमएस आणि ओटीटी सारखे फायदे मिळतात. म्हणजे या प्लॅनमध्ये काही नाही अशी तक्रार करता येणार नाही. जास्त वेळ न दवडता बीएसएनएलच्या लॉन्ग टर्म प्लॅनची माहिती घेऊया.

BSNL Rs 1999 Prepaid Plan

आज आम्ही तुम्हाला BSNL च्या 1999 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची माहिती देण्यात आहोत. या प्लॅनमध्ये ग्राहकांना संपूर्ण 12 महीने म्हणजे 365 दिवसांची वैधता मिळते. विशेष म्हणजे हा हा प्लॅन देशातील अनेक सर्कल्समध्ये उपलब्ध आहे. फक्त दीर्घ वैधता ही बीएसएनएलच्या प्रीपेड प्लॅनची खासियत नाही, तर यात इतर अनेक जबरदस्त बेनिफिट्स देखील कंपनी देत आहे. हे देखील वाचा: 12GB RAM आणि 120W चार्जिंगसह होणार iQOO Neo 7 5G ची भारतात एंट्री; वेबसाइटवर झाला लिस्ट

वैधता व्यतिरिक्त BSNL च्या या प्रीपेड प्लॅनसह युजर्सना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग मिळते. म्हणजे ग्राहक कोणत्याही नेटवर्कवर अमर्याद कॉलिंग करू शकतात. तसेच रोज 100 एसएमएस देखील या प्लॅनमध्ये ग्राहकांना मोफत दिले जात आहे. परंतु प्लॅनमध्ये मिळणारा 600GB डेटा याची खासियत म्हणता येईल. हा डेटा कोणत्याही डेली लिमिटविना येतो. म्हणजे वर्षभरात कधीही तुम्ही हा डेटा वापरू शकता.

डाटा आणि कॉलिंगसह ओटीटीचा फायदा

600GB डेटा संपल्यावर देखील तुम्ही इंटरनेट वापरू शकता. परंतु हायस्पीड इंटरनेटच्या ऐवजी तुमचा इंटरनेट स्पीड कमी होऊन 80 केबीपीएस होईल. तसेच युजर्सना 30 दिवसांचं PRBT आणि 30 दिवसांचं इरोज नाउ एंटरटेनमेंट आणि 30 दिवसांचं लोकधुन कंटेंटचं सब्सस्क्रिप्शन दिलं जाईल. हे देखील वाचा: 17,500 रुपयांमध्ये वनप्लसचा दणकट फोन; OnePlus Nord CE 2 Lite वर असा मिळवा अतिरिक्त डिस्काउंट

BSNL 5G ची जोरदार तयारी

बीएसएनएल आपले टॉवर्स अपग्रेड करत असल्याची माहिती सरकारी कंपनीनं दिली नाही तर स्वतः टेलिकॉम मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. गेली अनेक वर्ष भारतात मोठ्याप्रमाणावर 4G नेटवर्क देण्यात अपयश आल्यानंतर आता सरकारी कंपनी लवकरच 4G आणि 5G सर्व्हिस लाइव्ह करण्याची जोरदार तयारी करत आहे. आशा आहे की कंपनीच्या 3G सेवेप्रमाणे नव्या जेनरेशनची नेटवर्क सेवा देखील सामान्यांना परवडणारी असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here