वनप्लस 11 कॉन्सेप्ट फोन MWC 2023 मध्ये सादर

Highlights

  • OnePlus 11 concept phone एक नवीन ब्रँड न्यू टेक्नॉलॉजीसह आला आहे.
  • अ‍ॅक्टिव्ह क्रायोफ्लक्स कूलिंग टेक्नॉलॉजी फोनचं तापमान 2.1 ℃ पर्यंत कमी करते.
  • OnePlus 11 concept phone एक यूनिक डिजाइनसह आला आहे.

OnePlus नं आज MWC 2023 मध्ये बहुचर्चित वनप्लस 11 कॉन्सेप्ट फोन (OnePlus 11 concept phone –Active CryoFlux cooling technology) सादर केला आहे. या कॉन्सेप्ट फोनसह कंपनीनं एक नवीन अविष्कार सादर केला आहे. कंपनीनं अ‍ॅक्टिव्ह क्रायोफ्लक्स टेक्नॉलॉजी आपल्या या फोनमध्ये दिली आहे जी एक कूलिंग टेक्नॉलॉजी आहे जी फोन टेंपरेचर 2.1 ℃ पर्यंत कमी करू शकते. परंतु अन्य कॉन्सेप्ट फोन प्रमाणे हा फोन देखील विक्रीसाठी उपलब्ध होणार नाही, परंतु यातील टेक्नॉलॉजीचा कंपनी भविष्यातील फोनमध्ये वापर करू शकते.

OnePlus 11 concept phone

कंपनीनं, “वनप्लस 11 कॉन्सेप्टच्या इंजीनियरिंगचं यश आइस ब्लू पाइपलाइन्समधून दिसतं, ज्या फोनच्या संपूर्ण बॅक पॅनलवर आहेत. हे पाईप वनप्लस 11 कॉन्सेप्ट फोनमध्ये शरीरात पसरलेल्या रक्तवाहिन्यांप्रमाणे दिसतात. वनप्लस 11 कॉन्सेप्टची पाइपलाइन एक बोल्ड आणि फ्यूचरिस्टिक यूनीबॉडी ग्लास डिजाइनमध्ये आहे.” सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा फोन आइस ब्लू पाइपलाइनसह सादर करण्यात आला, जी फोनच्या संपूर्ण बॅक पॅनलला वेढा घालते. हे देखील वाचा: तुम्ही देखील बदलू शकाल या मोबाइलचा डिस्प्ले, बॅटरीसह बरंच काही; हटके Nokia G22 कमी किंमतीत लाँच

वर सांगितल्याप्रमाणे, कंपनीनुसार अ‍ॅक्टिव्ह क्रायोफ्लक्स कूलिंग टेक्नॉलॉजी फोनचं तापमान 2.1 ℃ पर्यंत कमी करते. तसेच गेमप्ले सेशन दरम्यान फ्रेम रेटमध्ये 3-4 fps चा सुधार मिळवून देऊ शकते. अ‍ॅक्टिव्ह क्रायोफ्लक्स बद्दल दावा करण्यात आला आहे की यामुळे हा फोन चार्जिंगच्या वेळी 1.6 ℃ पर्यंत कमी तापमानावर चार्ज होतो. त्यामुळे चार्जिंगची वेळ जवळपास 30 ते 45 सेकंद कमी होते.

OnePlus 11 Specifications

  • 6.7 QHD+ 2K E5 AMOLED डिस्प्ले
  • 50MP+48MP+32MP रियर कॅमेरा
  • 16GB RAM + 512GB storage
  • Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर
  • 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग

वनप्लस 11 5जी 3216 x 1440 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या क्यूएचडी+ 2के डिस्प्लेसह लाँच झाला आहे. ही स्क्रीन ई5 अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि कोर्निंग गोरिल्ला ग्लासच्या सुरक्षेसह येते. OnePlus 11 5G फोन अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसर देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी वनप्लस 11 5जी फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर 50MP Sony IMX890 प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 48MP Sony IMX581 अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 32MP Sony IMX709 2X पोर्टरेट लेन्ससह मिलकर चालतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: तुम्हाला ‘सेल्फी किंग’ बनवेल हा Xiaomi फोन; 5 कॅमेरे आणि आयफोनच्या लूकसह शाओमी 13 लाइट लाँच

पावर बॅकअपसाठी वनप्लस 11 5जी फोन 5,000एमएएच बॅटरीसह बाजारात आला आहे. या मोठ्या बॅटरीसह स्मार्टफोन पटकन चार्ज करण्यासाठी यात 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे जी काही मिनिटांत बॅटरी फुल चार्ज करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here