मोबाईल डेटा स्पीड मध्ये 130व्या नंबर वर पोहचला भारत, कमी झाला इंटरनेट स्पीड

कोरोना वायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाउन चालू आहे. याचकारणामुळे लोकांना घरी रहावे लागत आहे आणि अनेक लोक वर्क फ्रॉम होम करत आहेत म्हणजे घरातून ऑफिसचे काम करत आहेत, ज्यामुळे मोबाईल आणि होम ब्रॉडबँड डेटाचा जास्त वापर होत आहे. तसेच आता एक रिपोर्ट समोर आला आहे, त्यानुसार भारतात मोबाईल इंटरनेट आणि होम ब्रॉडबँडच्या स्पीड मध्ये घसरण झाली आहे.

सिंगापुर आणि UAE ने मारली बाजी

स्पीड टेस्ट वेबसाइट Ookla च्या ग्लोबल इंडेक्सने एक रिपोर्ट प्रकाशित केला आहे. या रिपोर्ट मध्ये फिक्स्ड आणि मोबाईल ब्रॉडबँड दोन्हींसाठी सर्व देशांची मोठी यादी इंटरनेट स्पीड रँकिंग दाखवत आहे. याबाबतीत यूएई पहिल्या क्रमांकावर आहे. UAE मध्ये मोबाईल डेटाचा स्पीड 83.52Mbps आहे. तर फिक्स्ड ब्रॉडबँडच्या बाबतीत सिंगापुर 197.26Mbps च्या सरासरी डाउनलोड स्पीड सह पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे.

मोबाईल डेटा स्पीड मध्ये 130व्या नंबर वर भारत

भारताबाबत बोलायचे तर आपण मार्चच्या तुलनेत खालच्या स्थानावर सरकलो आहोत. आता मोबाईल डेटा स्पीडनुसार भारत 130व्या नंबर वर आणि फिक्स्ड ब्रॉडबँडसाठी 71व्या स्थानावर आहे. Ookla चे सीईओ डग सटल्सच्या मते असे COVID-19 च्या लॉकडाउनमुळे होत आहे कारण यामुळे काही प्रमाणात इंटरनेट स्लोडाउन होणे साहजिक आहे.

भारतात कमी होत आहे ब्रॉडबँड स्पीड

Ookla ने असे म्हटले आहे कि भारताचा सरासरी ब्रॉडबँड स्पीड 2020 च्या सुरवातीपासून कमी होत आहे. जानेवारी मध्ये 41.48Mbps वरून मार्च मध्ये 35.98Mbps पर्यंत 5.5Mbps ने वेग कमी झाला आहे.

विशेष म्हणजे फेब्रवारी मध्ये Ookla ने भारतात फिक्स्ड-लाइन ब्रॉडबँड स्पीड मध्ये थोडी वाढ झाल्याचे सांगितले होते. भारतातील एसीटी फाइबरनेट सारख्या काही कंपन्या एप्रिलच्या शेवटपर्यंत डेटा कॅप काढून टाकत आहेत आणि हाई स्पीड देण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच YouTube, नेटफ्लिक्स आणि इतर अनेक कंटेन्ट ऍप्सनी बँडविड्थ वाचवण्यासाठी आपल्या वीडियो स्ट्रीमची गुणवत्ता कमी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here