Jio ची अजून एक भेट, JioPhone यूजर्सना मोफत मिळतील 100 मिनिट्स

देशात चालू असलेला 21 दिवसांचा लॉकडाउन पाहून बीएसएनएल आणि एयरटेल नंतर रिलांयसने आपल्या जियोफोन ग्राहकांसाठी शानदार भेट आणली आहे. कंपनीने JioPhone ग्राहकांसाठी एक खास ऑफर सादर केली आहे. या ऑफर मध्ये JioPhone यूजर्सची वैधता संपल्यावर पण त्यांची इनकमिंग चालू राहील.

इतकेच नव्हे तर यूजर्सना 17 एप्रिल 2020 पर्यंत कॉलिंगसाठी 100 मिनिट्स आणि 100 SMS फ्री मिळतील. त्याचबरोबर सर्व JioPhone यूजर्सना इनकमिंग कॉल वैधतेनंतर पण मिळतील. जियोच्या ऑफर नंतर त्या यूजर्सना सर्वात जास्त फायदा मिळेल, ज्यांचा प्लान लवकरच संपणार होता.

अलीकडेच रिलायंस जियोने ATM द्वारे रिचार्ज करण्याच्या सुविधेची पण घोषणा केली होती. यूजर्सना हि स्पेशल सर्विस देण्यासाठी जियोने 9 बँकांसोबत भागेदारी केली आहे. कंपनीने हा निर्णय कोरोना वायरसमुळे देशात सुरु असेलेल्या लॉकडाउन मध्ये घेतला आहे. यूजर्सना मोबाईल रिचार्ज करताना अडचण येत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर जियो यूजर्स UPI, एसएमएस आणि कॉलच्या माध्यमातून पण रिचार्ज करू शकतात.

असाच निर्णय BSNL आणि Airtel पण घेतला आहे. विशेष म्हणजे मुकेश अंबानी यांच्या रिलायंस इंडस्ट्रीजने पीएम केयर्स फंड मध्ये 500 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. कंपनीने घोषणा केली होती कि ते 5 लाख लोकांना पुढील 10 दिवस जेवण देईल. कोरोनामुळे चालू असलेल्या लॉकडाउन मध्ये कंपनी 50 लाख लोकांच्या जेवणाची सोया करेल.

रिलायंसने काही दिवसांपूर्वी आपल्या काही यूजर्सना भेट देत JIO DATA PACK पॅक सादर केला होता. हा पॅक 1 एप्रिल पर्यंत वैध आहे. रिलायंस जियोचा हा प्लान लॉकडाउनमुळे घरातून काम करत असलेल्या यूजर्सना खूप उपयोगी पडेल. एकदा पुन्हा सांगू इच्छितो कि जियोने सादर केलेल्या या डेटा पॅकसाठी यूजर्सना कोणताही रिचार्ज करण्याची गरज नाही. चीनच्या वुहान मध्ये नोव्हेंबर 2019 पासून कोरोना संक्रमणाची सुरवात झाली होती. आज या वायरसच्या विळख्यात चीन समवेत संपूर्ण जग आले आहे. हा खतरनाक वायरस पाहून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी संपूर्ण भारतात 21 दिवसांच्या बंदाची घोषणा केली आहे. म्हणजे 14 एप्रिल पर्यंत संपूर्ण देश लॉकडाउन असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here