Google Pixel 6 Pro स्मार्टफोनच्या लॉन्चपूर्वी समोर आली डिजाइन, बघा Photos

Google यावर्षीच्या शेवटपर्यंत Pixel 6 आणि Pixel 6 Pro स्मार्टफोन लॉन्च करू शकते. गेल्या आठवड्यात गुगलच्या आगामी स्मार्टफोनचे काही रेंडर्स पण दिसले होते. आता गुगलच्या आगामी स्मार्टफोन Google Pixel 6 Pro स्मार्टफोनचे काही नवीन रेंडर्स समोर आले आहेत. Pixel 6 Pro स्मार्टफोनचे लेटेस्ट रेंडर OnLeaks ने शेयर केले आहेत. या रेंडर्सच्या माध्यमातून Google Pixel 6 Pro स्मार्टफोनबद्दल अजून माहिती मिळत आहेत. लीक रिपोर्ट्सनुसार गुगलच्या या स्मार्टफोनच्या डिस्प्लेमध्ये बारीक चिन दिसत आहे. बोलले जात आहे कि गुगलच्या या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा कर्व्ड AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. रेंडर पाहून समजत आहे कि गुगलच्या या स्मार्टफोनमध्ये खूप कमी बेजल्स मिळतील. त्याचबरोबर फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाऊ शकतो. (Google Pixel 6 Pro renders leaks design and features check photos)

Google Pixel 6 Pro स्मार्टफोनच्या रेंडर्सवरून समजले आहे कि या फोनमध्ये फ्रंट कॅमेऱ्यासाठी डिस्प्लेमध्ये पंच होल डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा पंच होल कटआउट डिस्प्लेच्या वरच्या बाजूला मध्यभागी दिला जाईल. त्याचबरोबर फोनच्या बॉटमला चार्जिंग आणि डेटा ट्रांसफरसाठी USB Type C पोर्ट दिला जाईल. तसेच फोनच्या बॉटमला स्पीकर ग्रिल पण दिली जाऊ शकते. Google Pixel 6 Pro स्मार्टफोनबाबत अंदाज लावला जात आहे कि या फोनमध्ये कंपनी टॉप आणि बॉटमला स्टीरियो स्पीकर देऊ शकते.

हे देखील वाचा : OnePlus लवकरच Dimensity 1200 चिपसेटसह लॉन्च करू शकते स्मार्टफोन, संपेल OnePlus Nord 2 ची प्रतीक्षा

अपकमिंग Google Pixel 6 Pro स्मार्टफोनच्या समोर आलेल्या ऑनलाइन रेंडर्समध्ये फोनच्या डावीकडे वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण दिसत आहेत. त्याचबरोबर डावीकडे सिम ट्रे दिसत आहे. याआधी Google Pixel 6 Pro स्मार्टफोनच्या समोर आलेल्या रेंडरमध्ये कॅमेरा सेटअपची डिजाइन दिसली होती. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्यात एक प्राइमरी कॅमेरा, अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि टेलीफोटो लेंस दिली जाऊ शकते. त्याचबरोबर फोनमध्ये LED फ्लॅश पण देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : 25 मेला लॉन्च होईल 6GB RAM, 90Hz डिस्प्ले आणि 5,000mAh बॅटरी असलेला हा स्वस्त स्मार्टफोन

Google Pixel 6 Pro स्मार्टफोनच्या रेंडर्सवरून समजले आहे कि हा डुअल टोन डिजाइनसह सादर केला जाऊ शकतो. फोनच्या वरच्या बाजूला ऑरेंज कलर देण्यात आला आहे तर बॉटमला व्हाइट कलर दिला जाऊ शकतो. गुगलच्या फोनची साइज पाहता हि 163.9 x 75.8 x 8.9 मिलीमीटर असू शकतो. त्याचबरोबर अंदाज लावला जात आहे कि यात वायरलेस चार्जिंग दिली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here