11 मेला भारतात येत आहे Google Pixel 7A, फ्लिपकार्टवरून होईल विक्री

Highlights

  • Google Pixel 7A ची विक्री फ्लिपकार्टवरून होईल.
  • कंपनीनं ट्विट करून पिक्सल 7ए च्या लाँच डेटचा खुलासा केला आहे.
  • फोनमध्ये Google Tensor G2 चिपसेट मिळू शकतो.

गुगलच्या आगामी फोन Google Pixel 7A च्या भारतीय लाँचच्या डेटचा खुलासा करण्यात आला आहे. हा नवीन फोन भारतीय टेक मार्केटमध्ये 11 मेला लाँच केला जाईल. गुगल इंडियानं आपल्या सोशल मीडिया चॅनेलवर पोस्टच्या माध्यमातून भारतातील Google Pixel 7A च्या लाँचची माहिती दिली आहे. तसेच हँडसेटची विक्री फ्लिपकार्टच्या माध्यमातून होईल, हे देखील सांगितलं आहे. आगामी पिक्सल 7ए मध्ये Google Tensor G2 चिपसेट असू शकतो, अशी चर्चा आहे. त्याचबरोबर हा डिवाइस LPDDR5 रॅम आणि UFS 3.1 स्टोरेजसह येऊ शकतो.

गुगल पिक्सल 7ए ची किंमत (संभाव्य)

9to5Google च्या रिपोर्टमध्ये गुगल पिक्सल 7ए च्या किंमतीबाबत दावा करण्यात आला आहे की फोनची किंमत 499 डॉलर्स (जवळपास 41,000 रुपये) असू शकते, जी Pixel 6a पेक्षा 50 डॉलर्स जास्त आहे. हे देखील वाचा: Airtel-Jio च्या अनलिमिटेड 5G डेटावर येऊ शकते बंदी; ट्रायच्या नियमांचे होत आहे उल्लंघन

गुगल पिक्सल 7ए चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

डिस्प्ले : Google Pixel 7a स्मार्टफोनमध्ये 6.1-इंचाचा फुलएचडी+ ओएलईड डिस्प्ले मिळू शकतो, जो 90हर्ट्झ रिफ्रेश रेट, पंच होल कटआऊट आणि सिमिट्रिकल बेझलसह येऊ शकतो.

प्रोसेसर : Pixel 7a मध्ये गुगलचा स्वतःचा Tensor G2 चिपसेट दिला जाऊ शकतो, जो Pixel 7 आणि Pixel 7 Pro मध्येही देण्यात आला आहे.

रॅम आणि स्टोरेज या स्मार्टफोनमध्ये 8जीबी LPDDR5 रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ जाऊ शकते जी UFS 3.1 टेक्नॉलॉजीसह येऊ शकते.

ओएस : आगामी Pixel 7a मध्ये अँड्रॉइड 13 ऑपरेटिंग सिस्टम मिळण्याची शक्यता आहे.

कॅमेरा : कॅमेरा सेगमेंट पाहता या स्मार्टफोनमध्ये 64एमपीचा रियर कॅमेरा OIS सह दिला जाऊ शकतो आणि 12एमपीचा अल्ट्रा वाइड कॅमेरा मिळू शकतो. सेल्फीसाठी फोनमध्ये 10.8एमपीचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

बॅटरी : स्मार्टफोनमध्ये 4,400एमएएचची बॅटरी मिळू शकते जी 20वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते. यावेळी पिक्सल ए सीरिजच्या स्मार्टफोन्समध्ये देखील वायरलेस चार्जिंग दिली जाऊ शकते हे देखील वाचा: जियोनं लाँच केला JioDive VR Headset; 100-इंचाच्या स्क्रीनवर दिसेल IPL

कनेक्टिव्हिटी : Pixel 7a मध्ये 5जी, 4जी एलटीई, ड्युअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप सी चार्जिंग पोर्ट मिळू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here