
Xiaomi 13 series 26 फेब्रुवारीला ग्लोबली लाँच होत आहे. या दिवशी Xiaomi 13 Pro भारतात लाँच होईल जोडीला Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Lite येण्याची शक्यता आहे. परंतु या फ्लॅगशिप फोन्स सोबतच एक लो बजेट डिवायस Redmi 12C देखील जागतिक बाजारात येऊ शकतो. हा Low Budget Smartphone रेडमी 12सी 26 फेब्रुवारीला ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केला जाऊ शकतो.
Redmi 12C लाँचची माहिती टिपस्टर पारस गुगलानीच्या माध्यमातून समोर आली आहे. टिपस्टरचा दावा आहे की रेडमी 12सी स्मार्टफोन 26 फेब्रुवारीला ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. या फोनची घोषणा शाओमी 13 सीरीजसह होऊ शकते. विशेष म्हणजे हा रेडमी फोन चीनमध्ये आधीच उपलब्ध आहे जो आता अन्य देशांमध्ये विकला जाऊ शकतो. तसेच चर्चा आहे की Redmi 12C भारतात POCO C55 च्या स्वरूपात येऊ शकतो.
Redmi 12C Price
रेडमी 12सी बद्दल सांगण्यात आलं आहे की ग्लोबल मार्केटमध्ये हा फोन दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये येऊ शकतो. तसेच बेस मॉडेलमध्ये 3 जीबी रॅमसह 64जीबी स्टोरेज तर मोठा व्हेरिएंट 4जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करू शकतो. लीकनुसार या दोन्ही व्हेरिएंट्सच्या किंमती अनुक्रमे 170 यूरो आणि 200 यूरो असू शकतात. ही किंमत भारतीय करंसीनुसार 15,000 रुपये आणि 17,500 रुपयांच्या आसपास आहे. Redmi 12C ग्लोबल मार्केटमध्ये Ocean Blue, Mint Green आणि Graphite Gray कलरमध्ये लाँच होऊ शकतो. हे देखील वाचा: iPhone 14 Pro सारखा डिस्प्ले, 2-2 सेल्फी कॅमेरे; लाँचपूर्वीच Xiaomi 13 Lite ची किंमत लीक
चीनमधील Redmi 12C चे स्पेसिफिकेशन्स
- 6.71 इंच डिस्प्ले
- 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज
- मीडियाटेक हीलियो जी85
- 50एमपी ड्युअल कॅमेरा
- 10वॉट 5,000एमएएच बॅटरी
रेडमी 12सी स्मार्टफोन चीनमध्ये 20.6:9 अॅस्पेक्ट रेशियोसह सादर झाला आहे जो 1650 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.71 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही फोन स्क्रीन 500निट्स ब्राइटनेस आणि 1500:1 कॉन्ट्रास्ट रेशियोवर काम करते. या फोनचे डायमेंशन 68.76×76.41×8.77एमएम आणि 192ग्राम आहे. फोनमध्ये 3.5एमएम जॅक देखील देण्यात आला आहे.
Redmi 12C अँड्रॉइड ओएस आधारित मीयुआय 13 वर चालतो. या मोबाइल फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी85 देण्यात आला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. ग्राफिक्ससाठी या स्मार्टफोनमध्ये माली-जी52 एमपी2 जीपीयू देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन LPDDR4X RAM + eMMC 5.1 ROM वर चालतो. हे देखील वाचा: अरे बाप रे! 1.28 लाखांच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीची किंमत 87,298 रुपये, व्हायरल होत आहे बिल
फोटोग्राफीसाठी रेडमी 12सी स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जी सेकंडरी एआय लेन्स सह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा मोबाइल फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

















