29 मे ला नोकिया चा ईवेंट, लॉन्च होऊ शकतात नोकिया 2, नोकिया 3 आणि नोकिया 5 चे 2018 वर्जन

Curtsey - Digital Trends

टेक कंपनी एचएमडी ग्लोबल ने काल चीनी बाजारात आपला पहिला नॉच डिसप्ले वाला स्मार्टफोन नोकिया एक्स6 लॉन्च केला आहे. नोकिया एक्स6 कमी किंमतीत चांगले स्पेसिफिकेशन्स देत आहे. नोकिया एक्स6 सादर केल्यानंतर एचएमडी ग्लोबल लवकरच इतर काही स्मार्टफोन पण अंर्तराष्ट्रीय मंचावर आणणार आहे. नोकिया एक्स6 च्या चीन मधील लॉन्च नंतर एचएमडी ग्लोबल ने रशिया मध्ये एका ईवेंट ची घोषणा केली आहे. एचएमडी ग्लोबल येणार्‍या 29 मे ला तिथे ईवेंट चे आयोजन करत आहे ज्यात कंपनी चे नवीन नोकिया स्मार्टफोन सादर केले जातील.

नोकिया ब्रांड चे मालकी हक्क असणारी फिनिश कंपनी एचएमडी ग्लोबल ने मीडिया इन्वाईट शेयर केले आहेत ज्यानुसार 29 मे ला कंपनी रशिया मध्ये ईवेंट चे आयोजन करत आहे. जरी कंपनी ने सांगितले नाही की 29 मे ला कोणता स्मार्टफोन लॉन्च केला जाईल तरी अंदाज लावला जात आहे की यादिवशी एचएमडी ग्लोबल नोकिया चे एका पेक्षा जास्त स्मार्टफोन अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर करेल.

एचएमडी ग्लोबल बद्दल चर्चा सुरू आहे की 29 मे ला कंपनी चे हिट स्मार्टफोन नोकिया 2, नोकिया 3 आणि नोकिया 5 चे लेटेस्ट अपडेटेड वर्जन सादर केले जाऊ शकतात. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी रशियन सर्टिफिकेशन्स साइट वर टीए-1075, टीए-1105 आणि टीए-1116 मॉडेल नंबर वाले नोकिया चे स्मार्टफोन लिस्ट करण्यात आले होते. त्यामुळे 29 मे ला कंपनी हे तिन्ही नोकिया फोन सादर करू शकते याची शक्यता वाढत आहे.

काही दिवसांपूर्वी न्यू नोकिया 6 चा 4जीबी रॅम वाला वेरिएंट भारतात लॉन्च करण्यात आला होता जो नोकिया 6.1 नावाने सादर करण्यात आला आहे. त्यामुळे असे पण होऊ शकते नोकिया चे आगामी स्मार्टफोन नोकिया 2.1, नोकिया 3.1 किंवा नोकिया 5.1 नावाने अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर केले जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here