लॉन्चच्या आधीच असूस ने शेयर केला झेनफोन मॅक्स प्रो एम2 चा फोटो, नॉच सह दिसले 3 रियर कॅमेरा सेंसर

असूस येत्या 11 डिसेंबरला आपल्या झेनफोन सीरीज मध्ये नवीन डिवाईस झेनफोन मॅक्स प्रो एम2 लॉन्च करणार आहे. असूस आपल्या या स्मार्टफोनची सुरवात इंडो​नेशिया मधून करणार आहे आणि कंपनी ने आॅफिशियल ट्वीटर हँडल वरून याची माहिती दिली आहे. तर आता असूस ने पुन्हा एकदा एक नवीन ​ट्वीट करत फोनचा फोटो इंटरनेट वर शेयर केला आहे. असूसच्या या ​ट्वीट मधून झेनफोन मॅक्स प्रो एम2 च्या फ्रंट पॅनल आणि बॅक पॅनल सोबत फोनच्या डिस्प्ले आणि कॅमेरा सेग्मेंटची माहिती मिळाली आहे.

असूस ने अपने इंडोनेशियाई ट्वीटर हँडल वरून झेनफोन मॅक्स प्रो एम2 चा फोटो शेयर केला आहे. या ट्वीट मध्ये झेनफोन मॅक्स प्रो एम2 ला ‘रियर प्रो’ म्हणण्यात आले आहे. शेयर करण्यात आलेल्या फोटो मध्ये फोनची नॉच दाखवण्यात आली आहे जी आयफोन 10 सारखी आहे. या नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा आणि ईयरपीस आहे. झेनफोन मॅक्स प्रो एम2 चा डिस्प्ले दोन्ही बाजूंनी बेजल लेस दाखवण्यात आला आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनल वरील रियर कॅमेरा सेटअप पण या फोटो मध्ये दिसत आहे.

झेनफोन मॅक्स प्रो एम2 च्या बॅक पॅनल वर ​कॅमेरा सेटअप वर्टिकल शेप मध्ये आहे. फोटो मध्ये फोनच्या बॅक पॅनल वर 3 कॅमेरा सेंसर दिसत आहेत. या फोटो वरून हे कंफर्म झाले आहे कि झेनफोन मॅक्स प्रो एम2 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल, म्हणजे या फोनच्या बॅक पॅनल वर 3 कॅमेरा सेंसर दिले जातील. फोनचा बॅक पॅनल ग्लॉसी दाखविण्यात आला आहे. तर फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर पण फोटो मध्ये दिसत आहे.

असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 चे स्पेसिफिकेशन्स पाहता लीकनुसार हा फोन 6-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो. लीक नुसार कंपनी या फोन मध्ये 4जीबी रॅम दिला जाईल सोबत 64जीबी मेमरी तसेच 128जीबी स्टोरेजच्या चे दोन आॅप्शन मध्ये लॉन्च होईल. असूस आपला हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट सह लॉन्च कर शकते.

लीक मध्ये झेनफोन मॅक्स प्रो एम2 च्या बॅक पॅनल वरील ​तीन रियर कॅमेरा सेंसर किती पावर चे असतील हे सांगण्यात आले नाही. पण या फोन मध्ये 13-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असल्याची बाब या लीक मध्ये सांगण्यात आली आहे. तसेच झेनफोन मॅक्स एम2 बद्दल बोलायचे तर लीक नुसार कंपनी हा स्मार्टफोन पण 6-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह लॉन्च करेल.

झेनफोन मॅक्स एम2 पण 4जीबी रॅम सह सादर केला जाऊ शकतो सोबत हा फोन 32जीबी तसेच 64जीबी च्या दोन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध होईल. असूसच्या या फोन मध्ये क्वालकॉम चा स्नॅपड्रॅगॉन 636 चिपसेट मिळू शकतो. झेनफोन मॅक्स एम2 च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. तर सेल्फी साठी या फोन मध्ये पण 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 इंडियन मार्केट मध्ये कधी येईल हे आतातरी सांगता येणार नाही. पण बोलले जात आहे कि झेनफोन मॅक्स प्रो एम2 झेडबी634केएल मॉडेल नंबर सह बाजरात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here