Motorola चा नवीन स्मार्टफोन होत आहे भारतात लाँच, जाणून घ्या काय असेल यात खास

Motorola Edge 50 Pro 5G फोन 31,999 रुपयांमध्ये भारतात लाँच झाला आहे. या प्रीमियम मोबाईल फोननंतर आता कंपनी अजून एक नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात आणण्याची तयारी करत आहे. मोटोरोलाने आपल्या ऑफिशियल (एक्स) ट्वीटर हँडलवरून अपकमिंग फोनला टिझ केले आहे. हा मोबाईल फोन MOTO G64 5G नावाने भारतात लाँच होऊ शकतो.

वरती पोस्ट झालेल्या ट्विटमध्ये तुम्ही पाहू शकता की कंपनी आपल्या फोनला #UnleashTheBeast हॅशटॅग सह प्रोमोट करत आहे. सध्या या फोनचे नाव सांगण्यात आलेले नाही, परंतु मार्केटमध्ये चर्चा आहे की हा मोटो जी 64 5 जी नावाने लाँच होऊ शकतो. अपेक्षा आहे की येत्या आठवड्यात फोनचे नाव आणि याच्या लाँचच्या तारखेची पण घोषणा केली जाईल.

Moto G64 5G चे स्पेसिफिकेशन

हा मोटोरोला फोन बेंचमार्किंग साईट गीकबेंचवर ​लिस्ट झाला आहे जिथे याला MediaTek Dimensity 7025 चिपसेटसह सांगण्यात आले आहे. हा चिपसेट 2.5GHz Cortex-A78 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. तसेच फोनमध्ये 12GB RAM आणि Android 14 ओएस दिले जाणार असल्याची माहिती पण गीकबेंचवर मिळाली आहे. बेंचमार्क स्कोर पाहता हा Moto G64 5G ला सिंगल-कोरमध्ये 1026 आणि मल्टी-कोरमध्ये 2458 स्कोर मिळाला आहे.

 

Motorola G54 5G

Moto G54 5G चे स्पेसिफिकेशन

  • 6.5″ FHD+ 120Hz LCD Display
  • MediaTek Dimensity 7020
  • 50MP Dual Rear Camera
  • 16MP Selfie Camera
  • 6,000mAh battery
  • 33W Fast charging

मेमरी : MOTO G54 5G फोनला दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आले आहे. याचे बेस मॉडेल 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करते ज्याची किंमत 14,999 रुपये आहे. तसेच मोठ्या व्हेरिएंटमध्ये 12 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे तसेच याची किंमत 16,999 रुपये आहे.

डिस्प्ले : मोटो जी 54 5 जी फोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर बनला आहे जो 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन स्क्रीन पंच-होल स्टाईल असणारा आहे जो आयपीएस एलसीडी पॅनलवर बनला आहे. हा मोबाईल डिस्प्ले 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालतो.

प्रोसेसर : मोटो जी 54 5 जी अँड्रॉईड 13 ओएसवर लाँच झाला आहे. प्रोसेसिंगसाठी यात 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डिमेनसिटी 7020 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.2 गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये आईएमजी बीएक्सएम-8-256 जीपीयू आहे.

कॅमेरा : फोटोग्राफीसाठी मोटो जी 54 5 जी फोन ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर 8 मेगापिक्सलचा मॅक्रो + डेप्थ सेन्सरसह चालतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात एफ/2.4 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी : मोटो जी 54 5 जी फोन 6,000 एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. या पावरफुल बॅटरी सोबत फोनमध्ये 33W Turbo charging टेक्नॉलॉजी पण देण्यात आली आहे जी फक्त 33 मिनिटामध्ये 50% तसेच 66 मिनिटामध्ये 90% पर्यंत चार्ज करण्यामध्ये सक्षम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here