4,900एमएमएच बॅटरी सह टेना वर लिस्ट झाला Honor Play 9A, लवकरच होईल लॉन्च

Honor बद्दल बातमी आहे कि कंपनी लवकरच आपल्या ग्लोबल मार्केट मध्ये नवीन फ्लॅगशिप फोन Honor 30S लॉन्च करू शकते. मागे लीक मध्ये समोर आले होते कि हा डिवाईस हुआवईच्या किरीन 820 चिपसेट वर सादर केला जाईल. या चिपसेटची खासियत आहे कि हि 5G कनेक्टिविटी सह येते जी मीड रेंज फोन मध्ये येईल. Honor 30 सीरीज बाजारात येण्याआधी ब्रँडचा अजून एक नवीन फोन समोर आला आहे. ऑनरचा नवीन फोन चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर लिस्ट केला गेला आहे जिथे याचे नाव Honor Play 9A असल्याचे सांगण्यात आले आहे.

Honor Play 9A सर्टिफिकेशन्स साइट टेना वर MED-AL20 आणि MOA-AL20 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. इथे फोनचे नाव समजले नाही पण बोलले जात आहे कि हा फोन ‘ऑनर प्ले’ सीरीजचा आगामी डिवाईस Honor Play 9A असेल. लीक मध्ये फोनच्या फोटो सोबतच याच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा पण केला गेला आहे. सर्वातआधी लुक व डिजाईन बद्दल बोलायचे तर ऑनर प्ले 9ए वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर बनला असल्याचे दाखवण्यात आले आहे.

फोटो वरून समजले आहे कि स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस असतील पण खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट दिला जाईल. तसेच Honor Play 9A च्या बॅक पॅनल वर चौकोनी आकाराचा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो पॅनलच्या उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये दोन कॅमेरा सेंसर आणि एक फ्लॅश लाईट वर्टिकल शेप मध्ये आहे तर डावीकडे सेंसर डिटेल लिहिण्यात आले आहेत. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगर प्रिंट सेंसर आहे तसेच राईट साईड पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे.

Honor Play 9A

ऑनर प्ले 9ए चे स्पेसिफिकेशन्स् पाहता टेना नुसार या फोनचे डायमेंशन 159.07 x 74.06 x 9.04एमएम असे असतील आणि फोन मध्ये 6.3 इंचाचा फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले दिला जाईल. टेना वर हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 सह दाखवण्यात आला आहे जो मॅजिक यूआई 3.0 वर चालेल. फोन मध्ये प्रोसेसिंगसाठी मीडियाटेकचा हीलियो पी35 चिपसेट असल्याचे समोर आले आहे.

Honor Play 9A 4 जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे ज्या सोबत 64 जीबी स्टोरेज व 128 जीबी इंटरनल मेमरी दिली जाऊ शकते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता टेना नुसार फोनच्या बॅक पॅनल वर 13 मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी डेफ्थ सेंसर दिला जाऊ शकतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे तसेच टेना वर ऑनर प्ले 9ए 4,900एमएमएच च्या बॅटरी सह येईल जी 10वॉट चार्जिंग सपोर्ट सह येऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here