6,000mAh बॅटरी आणि 5 कॅमेऱ्यासह भारतात येत आहे Samsung Galaxy M32, किंमत असेल कमी

samsung Galaxy M42 5G price india

साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंग गेली अनेक दिवस बजेट आणि मिड रेंज स्मार्टफोन सेगमेंटमध्ये एकापाठोपाठ एक शानदार मोबाईल लॉन्च करून आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना आव्हान सादर करत आहे. आता बातमी समोर येत आहे कि कंपनी Galaxy M Series मध्ये एक नवीन फोन Samsung Galaxy M32 लॉन्च करणार आहे. अलीकडेच सॅमसंगचा हा अपकमिंग फोन Geekbench वर स्पॉट झाला होता, जिथे फोनच्या स्पेसिफिकेशन डीटेल्सबाबत माहिती समोर आली होती. आता हा फोन मॉडेल नंबर SM-M325FV/DS सह स्पॉट झाला आहे. या लिस्टिंगवरून स्पष्ट झाले आहे कि कंपनी लवकरच हा फोन टेक मंचावर सादर करणार आहे. (Samsung to launch new mobile Samsung Galaxy M32 with 6000mah battery specification)

Samsung Galaxy M32 कधी होईल लॉन्च

लिस्टिंगमध्ये सध्या फोनच्या लॉन्चबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु, वारंवार नवीन सर्टिफिकेशनवर हा फोन दिसल्यामुळे असे वाटत आहे कि लवकरच मार्केटमध्ये हा फोन लॉन्च होईल. तसेच आशा व्यक्त केली जात आहे कि हा फोन गॅलेक्सी एम31 चा अपग्रेडेड वर्जन असेल. शक्यता व्यक्त केली जात आहे कि गॅलेक्सी एम32 लॉन्च झालेल्या Galaxy A32 4G चा रिब्रँडेड वर्जन असेल.

हे देखील वाचा : Honor स्मार्टफोन मार्केटमध्ये करेल जोरदार पुनरागमन, Snapdragon 775G चिपसेटसह घेऊन येईल स्मार्टफोन

samsung galaxy m32 bluetooth sig

Samsung Galaxy M32 चे स्पेसिफिकेशन

ब्लूटूथ एसआईजी सर्टिफिकेशन साइटवर गॅलेक्सी एम32 SM-M325FV/DS मॉडेल नंबरसह दिसला आहे. सर्टिफिकेशन साइटवरून मिळालेल्या माहितीनुसार, सॅमसंग गॅलेक्सी एम32 मध्ये Bluetooth 5.0 कनेक्टिविटी मिळेल. हा 4जी फोन लेटेस्ट एंड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमसह लॉन्च केला जाईल.

हा फोन 6जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज ऑप्शनमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच यात MediaTek Helio G80 प्रोसेसर मिळेल. डिवाइसमध्ये कोणते फीचर्स असतील याची ठोस माहिती मिळाली नाही.

Samsung अपकमिंग फोन Galaxy M32

Samsung Galaxy M32 चे बाकीचे फीचर्स पाहता यात 6.4 इंचाचा HD+ AMOLED डिस्पले मिळेल. तसेच सॅमसंगच्या या आगामी फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळेल, ज्याचा प्राइमरी सेंसर 48 मेगापिक्सलचा असेल. सोबत 8 एमपीची अल्ट्रावाइड लेंस आणि 2-2 मेगापिक्सलचा डेप्थ आणि मॅक्रो सेंसर असेल.

हे देखील वाचा : Google Photos ची फ्री स्टोरेज सर्विस बंद होणार आहे 1 जूनला, डिलीट होण्यापूर्वी अश्याप्रकारे करा फोटो डाउनलोड

या फोनमध्ये सेल्फीसाठी 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असू शकतो. सॅमसंग गॅलेक्सी एम32 मध्ये 6000 एमएएचची बॅटरी असू शकते, जी फास्ट चार्जिंगला सपोर्टसह येऊ शकते. सॅमसंग हा फोन लवकरच भारतात लॉन्च करू शकते आणि याची संभावित किंमत 10 ते 15 हजार रुपयांच्या आसपास असू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here