Google Photos ची फ्री स्टोरेज सर्विस बंद होणार आहे 1 जूनला, डिलीट होण्यापूर्वी अश्याप्रकारे करा फोटो डाउनलोड

Google Photos

स्मार्टफोन युजर्सना Google Photos वर मिळणारी फ्री स्टोरेज सर्विस आता बंद होणार आहे. एक जूनपासून युजर्सना या सर्विससाठी शुल्क द्यावे लागेल. गुगलने गेल्यावर्षी घोषणा केली होती कि गुगल फोटोजमध्ये अनलिमिटेड फ्री फोटो बॅकअप सर्विस यावर्षी बंद होईल. याचा अर्थ असा आहे कि एक जून 2021 पासून गुगल क्लाउड स्टोरेजसाठी युजर्सना गुगलकडून मिळणाऱ्या 15GB मध्ये आपला डेटा मॅनेज करावा लागेल किंवा Google One सब्सक्रिप्शन घेऊन क्लाउडमध्ये फोटो सेव करावे लागतील. जर तुम्ही पण गुगल फोटो वर तुमचे फोटोज सेव करून ठेवले असतील तर कंप्यूटरवर फोटो डाउनलोड करून घ्या नाही तर तुमचे फोटोज डिलीत होऊ शकतात. (Google Photos free storage service ends on June 1 download photos before they are deleted)

अश्याप्रकारे करा डाउनलोड

गुगल क्लाउड बॅकअपवरून सर्व गुगल फोटोज डाउनलोड करण्याच्या अनेक पद्धती आहेत. इथे आम्ही तुम्हाला काही बेस्ट पद्धती सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही गुगल क्लाउडवरून तुमचे फोटो डाउनलोड करू शकता. गुगल फोटोजवरून फोटो डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला तुमच्या ब्राउजरमध्ये photos.google.com वर तुमच्या Gmail ID ने लॉगइन करावे लागेल. तिथे तुम्हाला तुमच्या फोटोजचा अ‍ॅक्सेस मिळेल. फोटो ओपन करून तुम्ही डाउनलोड करू शकता. इथे युजर्स एक साथ अनेक फोटो पण डाउनलोड करू शकतात.

हे देखील वाचा : LeEco करेल धमाकेदार पुनरागमन, लवकरच लॉन्च करेल दमदार LeTV Super Phone स्मार्टफोन

गुगल फोटोज मध्ये सेव सर्व फोटोज डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला Google Takeout टूलचा वापर करावा लागेल. Google Takeout च्या मदतीने तुम्ही गुगलच्या सर्व प्लॅटफॉर्मवरील तुमचा डेटा एकसाथ डिलीट करू शकता. यासाठी तुम्हाला ब्राउजरवर takeout.google.com मध्ये लॉगइन करावे लागेल. इथे तुम्हाला ‘Create a New Export’ वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला चेकबॉक्सवर क्लिक करून गुगलला सांगावे लागेल कि तुम्ही कोणकोणता डेटा डाउनलोड करू इच्छित आहात. त्याचबरोबर युजर्सना दुसऱ्या क्लाउड प्लॅटफॉर्ममध्ये डेटा ट्रांसफर करण्याचा ऑप्शन पण मिळतो.

हे देखील वाचा : Honor स्मार्टफोन मार्केटमध्ये करेल जोरदार पुनरागमन, Snapdragon 775G चिपसेटसह घेऊन येईल स्मार्टफोन

Google Takeout टूल वापरणाऱ्या युजर्सने लक्षात ठेवावे कि एकावेळी जास्तीत जास्त 12GB डेटा डाउनलोड करता येईल. जर तुमचा एकूण डेटा 12GB चा असेल तर गुगल तुम्हाला 1GB च्या 12 वेगवेगळ्या डाउनलोड लिंक मिळतील, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमचा डेटा डाउनलोड करू शकाल.

Google Photos चा डेटा अश्याप्रकारे करा चेक

Google युजर्सना 15GB पर्यंत डेटा मोफत दिला जातो. त्यामुळे जर गुगल फोटो अ‍ॅपवर तुमचा 15GB पर्यंत डेटा असेल तर तुम्ही अजूनही हि सेवा वापरू शकाल. Google Photos वर किती डेटा सेव आहे यासाठी तुम्हाला तुमच्या प्रोफाइल फोटोवर क्लिक करावे लागेल. तिथे तुम्हाला सेटिंग मेन्यूच्या अकाउंट स्टोरेज सेक्शनमध्ये स्टोरेजची माहिती मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here