Instagram Reels मध्ये म्यूजिक कस लावायचं? जाणून घ्या सर्वात सोपी ट्रिक

तुम्हाला तुमच्या इन्स्टाग्राम रील्स (Instagram Reels) मध्ये म्यूजिक जोडायचं आहे का? पद्धत खूप सोपी आहे. तुम्ही रील्ससह ऑरिजिनल ऑडियो देखील जोडू शकता किंवा तुमच्या आवडीचं म्यूजिक देखील लावू शकता. सध्या ऑडियो असलेल्या रील्स जास्त ट्रेंडमध्ये आहेत आणि लोकांना खूप आवडत आहेत. रील्स इन्स्टाग्रामवर शॉर्ट व्हिडीओ बनवण्याची एक शानदार पद्धत आहे. चला जाणून घेऊया की कशाप्रकारे इन्स्टाग्राम रील्स मध्ये म्यूजिक जोडता येईल.

Instagram Reels मध्ये म्यूजिक लावण्याची पद्धत

तुम्ही पुढील 10 स्टेपच्या मदतीनं तुमच्या इन्स्टा रील्समध्ये ऑरिजिनल ऑडियो किंवा म्यूजिक जोडू शकता :

  • स्टेप 1: सर्वप्रथम डिवाइसवर इन्स्टाग्राम अ‍ॅप (Instagram app) ओपन करा.
  • स्टेप 2: त्यानंतर खाली + icon वर टॅप करा.
  • स्टेप 3: आता साइडबारमधून Reels असलेल्या ऑप्शनमध्ये जा म्हणजे इन्स्टाग्राम कॅमेरा ओपन होईल. इन्स्टाग्रामला कॅमेरा आणि मायक्रोफोन अ‍ॅक्सेस द्या.
  • स्टेप 4: रील बनवली असेल तर स्क्रीनच्या वरच्या बाजूला ऑडियो बटनवर टॅप करा.
  • स्टेप 5: रील्स मध्ये म्यूजिक जोडण्यासाठी म्यूजिक आयकॉनवर टॅप करा.
  • स्टेप 6: म्यूजिक अँड ऑडियो असलेली लिस्ट ब्राउज करा किंवा खास ट्रॅक सर्च देखील करता ईल.
  • स्टेप 7: ट्रॅक निवडून झाल्यावर त्या गाण्याचा जो भाग वापरायचा आहे तो निवडा. त्यासाठी स्क्रीनच्या खाली डावीकडे किंवा उजवीकडे टाइमलाइन स्लाइड करता येते.
  • स्टेप 8: गाण्याचा समाधानकारक भाग मिळाल्यावर स्क्रीनच्या वरच्या बाजूला उजवीकडे Done वर टॅप करा.
  • स्टेप 9: रीलची एडिटिंग संपल्यावर स्क्रीनच्या खाली उजवीकडे नेक्स्टवर टॅप करा.
  • स्टेप 10 : तसेच रील्ससह कॅप्शन टाकू शकता, कव्हर एडिट करू शकता आणि लोकांना टॅग देखील करू शकता. रील पूर्णपणे तयार झाल्यावर स्क्रीनच्या खाली उजवीकडे Share बटन वर टॅप करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here