Instagram पासून राहायचे आहे का दूर मग अश्याप्रकारे करा तुमचे अकाउंट डिलीट

सोशल मीडिया साइट Instagram मित्रांच्या संपर्कात राहण्यासाठी एक चांगले माध्यम आहे. पण अनेकदा आपल्याला याचा कंटाळा येतो आणि काही दिवस या प्रकारच्या सोशल मीडियापासून काही हात लांब राहावे असे वाटते. अश्यावेळी सर्वप्रथम तुम्ही तुमचे इंस्टाग्राम अकाउंट डिलीट किंवा डीअ‍ॅक्टिव्हेट करावे. लक्षात असू द्या कि फक्त इंस्टग्राम अ‍ॅप काढून टाकल्याने हे काम होत नाही. आता तुम्ही विचार करत असाल कि हे काम कसे करता येईल आणि किती वेळाने आपण हे अकाउंट पुन्हा रिस्टोर करू शकतो किंवा नाही करू शकत. या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आम्ही तुम्हाला हे काम करण्याची संपूर्ण प्रक्रिया सोप्प्या स्टेप्समध्ये सांगणार आहोत. (How to delete deactivate Instagram account simple steps)

एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल कि तुमचे इंस्टाग्राम अकाउंट तेव्हा डिलीट करा जेव्हा तुम्ही याबाबत ठोस निर्णय घेतला असेल कारण एकदा अकाउंट डिलीट झाले कि ते पुन्हा मिळवण्याची कोणतीही पद्धत उपलब्ध नाही. परंतु, इंस्टाग्राम अकाउंट डीअ‍ॅक्टिव्हेट केल्यानंतर हे पुन्हा अ‍ॅक्टिव्ह केले जाऊ शकते.

इंस्टाग्राम अकाउंट कशाप्रकारे करावे डीअ‍ॅक्टिव्हेट

Instagram अकाउंट तात्पुरते डीअ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा. लक्षात असू द्या कि हे काम फक्त वेब ब्राउजरमधून करता येते कारण इंस्टाग्राम अ‍ॅपमध्ये यासाठी ऑप्शन देण्यात आला नाही.

Instagram

  • सर्वप्रथम आपल्या फोनचा किंवा डेस्कटॉपच्या ब्राउजरमधून https://www.instagram.com ओपन करून तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लॉग इन करा.
  • अकाउंट लॉग इन केल्यानंतर प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा जो टॉप राइट कॉर्नरवर असेल. त्यानंतर ‘Profile’ सिलेक्ट करा.
  • प्रोफाइल सिलेक्ट केल्यानंतर ‘Edit Profile’ ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर खाली स्क्रोल करा जोपर्यंत ‘Temporarily disable my account’ ऑप्शन दिसत नाही.
  1. डिसेबल बटणवर क्लिक केल्यानंतर इंस्टाग्राम पेजवर ड्रॉप डाउन मेन्यू येईल ज्यात इंस्टाग्राम तुम्हाला विचारेल – तुम्हाला अकाउंट का डिअ‍ॅक्टिव्हेट करायचे आहे? ड्रॉप डाउन बॉक्स बघा आणि त्यावर क्लिक करा. त्या ड्रॉपडाउन बॉक्समध्ये काही कारणे असतील. जे कारण तुम्हाला योग्य वाटेल त्याची निवड करा.
  • त्यानंतर ‘Temporarily Disable Account’ बटणवर टॅप करून इंस्टाग्राम अकाउंट डीअ‍ॅक्टिव्हेट केले जाऊ शकते.

एकदा जर तुम्ही सर्व स्टेप्स फॉलो केल्या तर तुम्ही तुमचे इंस्टाग्राम अकाउंट यशस्वीरीत्या डीअ‍ॅक्टिव्हेट करू शकाल. जर तुम्ही पुन्हा तुमचे इंस्टाग्राम अकाउंट सक्रिय करू इच्छित असाल तर तुम्हाला फक्त अकाउंट लॉग-इन करावे लागेल.

इंस्टाग्राम अकाउंट डिलीट कसे करावे

जर तुम्ही कायमस्वरूपी तुमचे अकाउंट काढून टाकू इच्छित असाल तर अकॉउंट डिलीट करणे फायदेशीर ठरेल. तुम्ही तुमच्या Instagram अकाउंटसोबतच सर्व डेटा पण काढून टाकू शकता. या कामासाठी पण तुम्हाला वेब ब्राउजरचा वापर करावा लागेल.

Instagram

  • इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करण्यासाठी तुम्हाला डेस्कटॉप किंवा मोबाईलच्या मदतीने ब्राउजरवर आपले अकाउंट लॉग-इन करावे लागेल.
  • अकाउंटच्या होम पेजवर युजर नेमवर क्लिक करा जी स्क्रीनच्या उजवीकडे असेल. युजरनेमवर क्लिक करून तुम्हाला ड्रॉप डाउन बॉक्स (drop down box) चा ऑप्शन दिसेल.
  • ड्रॉप डाउन बॉक्समध्ये एक ऑप्शन असेल- Edit Profile. या लिंकवर क्लिक करा.
  • Edit Profile निवडल्यावर जे पेज येईल, त्यात तुमच्या अकाउंटबाबत माहिती असेल (जी तुम्ही हवी असल्यास आता एडिट करू शकता) पेजवर खाली स्क्रोल करत जा, जिथे तुम्हाला एक बटण- I’d like to delete my account दिसले . त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा पासवर्ड टाका आणि कायमस्वरूपी अकाउंट डिलीट करण्याच्या ऑप्शनवर टॅप करा.

लक्षात असू द्या कि जेव्हा तुम्ही तुमचा Instagram अकाउंट डिलीट कराल तेव्हा इंस्टाग्रामवर अपलोड केलेले फोटो आणि व्हिडीओ पण डिलीट होतील. यासाठी तुम्ही आधीच बॅकअप घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here