पॅन कार्ड, ड्रायविंग लायसन्स सारखे महत्वाचे ठेवा फोनमध्ये; काही स्टेप्समध्ये सुरु करा डिजीलॉकर

Highlights
  • डिजीलॉकर (DigiLocker) भारत सरकारचं क्लाउड डॉक्यूमेंट स्टोरेज वॉलेट आहे.
  • डिजीलॉकरमध्ये भारतीय नागरिक आपले सर्व डॉक्युमेंट डिजिटली सुरक्षित ठेऊ शकतात.
  • अनेक प्लॅटफॉर्म्सवर डिजीटली ऑथेंटिकेशन देखील करता येतं.

How To Start DigiLocker: डिजीलॉकर (DigiLocker) भारत सरकारचं क्लाउड डॉक्यूमेंट स्टोरेज वॉलेट आहे. हा प्लॅटफॉर्म इलेक्ट्रॉनिक आणि इनफॉर्मेंशन टेक्नॉलॉजी मंत्रालय (MeitY) नं डिजिटल इंडिया अंतगर्त तयार केला आहे. याच्या मदतीनं भारतीय नागरिक आपले डॉक्यूमेंट डिजीटल स्वरूपात व्हेरिफाय करण्यासह स्टोर देखील करू शकतात. उदा जर तुम्हाला बँकमधील अकाऊंटसाठी KYC करायची असेल तर तुम्ही डिडीलॉकरद्वारे ऑनलाइन करू शकता. DigiLocker मध्ये युजर्स आपले महत्वाचे डॉक्यूमेंट जसे की पॅन कार्ड, ड्राईव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, शाळातील मार्कशीट, इंश्योरेंस पेपर, आयुषमान कार्ड स्टोर इत्यादी स्टोर करून ठेऊ शकतात.

डिजीलॉकरमध्ये भारतीय नागरिक आपले सर्व डॉक्युमेंट डिजिटली सुरक्षित ठेऊ शकतात. तसेच अनेक प्लॅटफॉर्म्सवर डिजीटली ऑथेंटिकेशन देखील करू शकतात. याच्या मदतीनं नागरिक सरकारी सेवा, रोजगार, शिक्षा, आरोग्याच्या सुविधांचा सहज लाभ घेऊ शकतात. इथे आम्ही तुम्हाला डिजीलॉकरवर अकाऊंट क्रिएट करण्याची माहिती देणार आहोत. हे देखील वाचा: ठरलं तर! Vivo Y56 आणि Vivo Y100 करणार भारतात एंट्री; कंपनी करत आहे मोठी तयारी

DigiLocker अकाऊंट कसं बनवायचं? | How To Start DigiLocker?

स्टेप 1: गुगल प्ले स्टोर (Google Play Store) वरून सर्वप्रथम तुमच्या फोनवर DigiLocker अ‍ॅप डाउनलोड करा.

स्टेप 2: अ‍ॅप ओपन करा आणि तुमच्या भाषेची निवड करा.

स्टेप 3: स्क्रोल डाउन करा आणि ‘गेट स्टार्ट’ बटनवर टॅप करा.

स्टेप 4: तिथे ‘क्रिएट अ‍ॅन अकाऊंट’ वर क्लिक करा. हे देखील वाचा: GPay, Paytm आणि PhonePe वर अशी करा बिलाची समसमान वाटणी; कॅल्क्युलेटरचीही गरज नाही

स्टेप 5: इथे तुमचं नाव, जन्मतारीख, मोबाइल नंबर, इमेल आयडी आणि आधार कार्ड नंबर संबंधित माहिती जोडा. त्यानंतर 6 डिजिट सिक्योरिटी पिन सेट करा. त्यानंतर सब्मिट बटनवर क्लिक करा.

स्टेप 6: तुमच्या तुम्हाला रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि ईमेल वर OTP पाठवला जाईल. तुम्हाला OTP सबमिट करावा लागेल, ज्या द्वारे आधारची डिटेल फेच केली जाईल. हे देखील वाचा: How To Download Youtube Shorts : पाहा युट्युब शॉर्ट्स व्हिडीओ डाउनलोड करण्याच्या सर्वात सोप्या ट्रिक्स

अशाप्रकारे तुमचं डिजीलॉकर (DigiLocker) अकाऊंट सेटअप होईल.

Published by
Siddhesh Jadhav