HUAWEI चा सर्वात पावरफुल फोन Mate 30 Pro लॉन्च, फीचर्स इतके एडवांस की Apple-Samsung पण राहिले मागे

HUAWEI ने आज अंर्तराष्ट्रीय मंचावर आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत नवीन ‘मेट सीरीज’ सादर केली आहे. जर्मनी मध्ये आयोजित ईवेंटच्या मंचावरुन कपंनीने एक साथ 2 पावरफुल फोन बाजारात आणले आहेत ज्यात HUAWEI Mate 30 आणि HUAWEI Mate 30 Pro चा समावेश आहे. मागे हुआवई बद्दल अमेरिकेत सुरु झालेल्या वादंगानंतरचा हा हुआवईचा सर्वात मोठा लॉन्च ईवेंट. हे दोन्ही स्मार्टफोन हाईएंड डिवाईस आहेत जे फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये आले आहेत. चला तर मग एक नजर टाकूया शानदार लुक आणि दमदार स्पेसिफिकेशन्स सह येणाऱ्या HUAWEI Mate सीरीजच्या नवीन स्मार्टफोन्स वर.

डिजाईन

HUAWEI Mate 30 सीरीज अल्ट्रा-नॅरो नॉच डिजाईन वर लॉन्च केली गेली आहे ज्यात खूपच कमी बेजल्स देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे सीरीजचा Mate 30 Pro कंपनीने बटणलेस बनवला आहे पण फोन साईड पॅनल वरील सेंसरने वाल्यूम इत्यादि कंट्रोल करता येईल. यूजर या सेंसर वर शार्टकटची कमांड आपल्या मर्जीने बदलू शकतात. बॅक पॅनल पाहता मेट 30 सीरीज मध्ये राउंड शेप रियर कॅमेरा देण्यात आला आहे, जो मधोमध आहे. बॅक पॅनल वर डावीकडे वर फ्लॅश लाईट आहे त्यासोबत Leica ची ब्रॅण्डिंग देण्यात आली आहे. तसेच खालच्या बाजूला HUAWEI चे नाव आहे. फोनच्या खालच्या पॅनल वर स्पीकर सह यूएसबी टाईप सी पोर्ट आहे.

HUAWEI Mate 30 Pro

हुआवई ने आपला हा पावरफुल स्मार्टफोन 18.4:9 आस्पेक्ट रेशियो वर 2400 x 1176 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.53-inch फुलएचडी+ OLED डिस्प्ले वर सादर केला आहे जो स्क्रीन साउंड टेक्नोलॉजी सह येतो. तसेच डिवाईस अनलॉकिंग व सिक्योरिटी साठी HUAWEI Mate 30 Pro ची स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येते. कपंनीने हा फोन एंडरॉयड 10 आधारित ईएमयूआई 10.0 वर सादर केला गेला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह हुआवईच्या 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या किरीन 990 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता HUAWEI Mate 30 Pro क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर वाला 40 MP चा सेंसर देण्यात आला आहे ज्याला कंपनीने Cine Camera म्हटले आहे. त्याचबरोबर मेट 30 प्रो रियर कॅमेरा सेटअप मध्ये एफ/1.6 अपर्चर वाला 40 MP चा सुपरसेंसिंग कॅमेरा, एफ/2.4 अपर्चर असलेली 8 MP ची टेलीफोटो लेंस आणि एक 3डी डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे. हा कॅमेरा 3x optical zoom, 5x hybrid zoom आणि 30x digital zoom ला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Mate 30 Pro मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 32 MP चा फ्रंट कॅमेरा आहे.

HUAWEI Mate 30 Pro डुअल सिम फोन आहे जो बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह येतो. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सोबत 3D फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन आईपी68 रेटेड आहे ज्यामुळे हा पाणी व धुळीपासून वाचतो. तसेच पावर बॅकअप साठी Mate 30 Pro मध्ये 4500एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 40वॉट सुपरचार्ज टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

HUAWEI Mate 30

मेट 30 हुआवई द्वारा लॉन्च नवीन सीरीजचा बेस मॉडेल आहे. हा स्मार्टफोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर झाला आहे जो 1,080 x 2,340 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.62-inch OLED डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करते. कपंनीने हा फोन एंडरॉयड 10 आधारित ईएमयूआई 10.0 वर सादर केला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह हुआवईच्या 7एनएम टेक्नॉलॉजी वर बलेल्या किरीन 990 चिपसेट वर चालतो.

Mate 30 चा फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हा ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 40 MP चा सुपर सेंसिंग कॅमेरा देण्यात आला आहे ज्यासोबत 16 MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एक 8 MP ची टेलीफोटो लेंस आहे. हा फोन आईपी53 रेटेड आहे. तसेच पावर बॅकअप साठी HUAWEI Mate 30 मध्ये 27वॉट सुपरचार्ज टेक्नॉलॉजी असलेली 4,200एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत आणि वेरिएंट

Huawei Mate 30 Pro 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज सह लॉन्च केला गेला आहे ज्याची किंमत 1099 यूरो आहे. हि किंमत इंडियन करंसी नुसार जवळपास 87,000 रुपये आहे. HUAWEI ने फोनचा 5जी मॉडेल पण बाजारात आणला आहे ज्याची किंमत 1199 यूरो म्हणजे जवळपास 95,000 रुपये आहे. तसेच HUAWEI Mate 30 8 जीबी रॅम + 128 स्टोरेज सह 799 यूरो मध्ये लॉन्च केला गेला आहे. हि किंमत 63,000 रुपयांच्या आसपास आहे. HUAWEI Mate 30 आणि Mate 30 Pro Emerald Green, Space Silver, Cosmic Purple, Black, whereas Forest Green आणि Orange कलर मध्ये लॉन्च केले गेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here