आयडिया ने लॉन्च केला 149 रुपयांचा वॉयस प्लान, 21 दिवसांसाठी मिळेल भरपुर मजा

देशातील सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएल ने काही दिवसांपूर्वी 99 रुपयांचा नवीन प्लान सादर केला होता जो यूजर्सना 28 दिवसांसाठी अनलिमिटेड वॉयस कॉल बेनिफिट देत आहे. टेलीकॉम बाजारात आपला डाव खेळत आता दुसर्‍या टेलीकॉम कंपनी आइडिया ने पण नवीन वॉयस प्लान जारी केला आहे. आयडिया ने 149 रुपयांचा नवीन प्लान सादर केला आहे जो यूजर्सना संपूर्ण देशात अमर्याद कॉलिंग ची सुविधा देतो.

आयडिया ने सादर केलेला 149 रुपयांचा प्लान प्रीपेड कस्टमर्स साठी आहे. हा प्लान 21 दिवसांच्या वैधते सह येतो. आधी सांगितल्याप्रमाणे हा एक वॉयस प्लान आहे जो कॉलिंग बेनिफिट देतो. या प्लान मध्ये यूजर्सना 21 दिवसांसाठी अन​लिमिटेड लोकल व नेशनल वॉयस कॉलिंग ची सुविधा मिळते जी रोमिंग मध्ये पण फ्री असेल. वॉयस कॉल सह या प्लान मध्ये रोज 100 एसएमएस पण यूजर्सना मिळतील.

पण आयडिया चे हे फ्री ​अनलिमिटेड कॉल पण ट्राई च्या नियमांनुसार वापरता येतील. या नियमांनुसार एक दिवसात जास्तीत जास्त 250​ मिनिट फ्री वॉयस कॉल मिळतील जे एका आठवड्यात 1,000 मिनिट या हिशोबाने वापरता येतील. तसेच कोणताही यूजर हे वॉयस कॉल एका महिन्यात जास्तीत जास्त 100 नवीन नंबर्स वर करू शकतो. ठराविक मर्यादेपेक्षा जास्त वापर झाल्यास टेलीकॉम नंबर कर्मिशयल नंबर श्रेणीत येतो.

जे आयडिया यूजर्स या वॉयस प्लान सोबत इंटरनेट डाटा पण वापरू इच्छित असतील कंपनी ने त्यांच्यासाठी 92 रुपयांचा प्लान सादर केला आहे. या प्लान मध्ये 7 दिवसांच्या वैधते सह एकूण 6जीबी इंटरनेट डाटा दिला जात आहे जो 3जी सह 4जी स्पीड वर पण वापरता येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here