टेक कंपनी इनफिनिक्स ने काही दिवसांपूर्वी भारतात आपला नवीन डिवाईस स्मार्ट 2 फोन लॉन्च केला होता जो 5,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. तसेच आज पुन्हा देशात आपल्या स्मार्टफोन चा आकडा वाढवत इनफिनिक्स ने अजून एक नवीन डिवाईस सादर केला आहे. कंपनी ने इनफिनिक्स नोट 5 लॉन्च केला आहे जो बेजल लेस डिस्प्ले सह पावरफुल बॅटरी ला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन दोन वेरिएंट मध्ये लॉन्च झाला आहे जो 31 ऑगस्ट पासून फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल.
इनफिनिक्स नोट 5 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन पण ट्रेंड मधील 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर झाला आहे. फोन मध्ये 2,160 x 1,080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6-इंचाचा फुलएचडी+ आईपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड ओरियो सह एंडरॉयड वन एडिशन वर सादर करण्यात आला आहे म्हणजे या फोनला गूगल कडून येणारे सर्व अपडेट सर्वात आधी मिळतील. 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या प्रोसेसर सह हा फोन मीडियाटेक हेलीयो पी23 चिपसेट वर चालतो.
कंपनी ने इनफिनिक्स नोट 5 दोन वेरिएंट मध्ये सादर करण्यात आला आहे. एक वेरिएंट 3जीबी रॅम सोबत 32जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो तर दुसर्या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट्स ची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 128जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सोबत एफ/2.0 अपर्चर वाला 12-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला तर सेल्फी साठी हा फोन 16-मेगापिक्सल च्या फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो.
इनफिनिक्स नोट 5 डुअल सिम फोन आहे याची एक खासियत म्हणजे हा फोन दोन्ही सिम वर 4जी वोएलटीई नेटवर्क ला सपोर्ट करतो. तसेच बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत या फोन मध्ये 4,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे ज्यात एआई पावर मॅनेजमेंट फीचर आहे. किंमत पाहता फोन चा 3जीबी रॅम वेरिएंट 9,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे तसेच याचा 4जीबी रॅम वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
इनफिनिक्स नोट 5 येत्या 31 ऑगस्ट पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल. हा फोन आइस ब्लू, बर्लिग ग्रे आणि मिलान ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये विकत घेता येईल.















