12जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला Nubia Red Magic 3, OnePlus ला मिळेल टक्कर

ZTE च्या सब-ब्रान्ड Nubia ने एप्रिल मध्ये अंर्तराष्ट्रीय मंचावर आपली स्मार्टफोन सीरीज वाढवत Red Magic 3 स्मार्टफोन लॉन्च केला होता. नुबिया ने हा फोन सर्वात आधी चीन मध्ये उतरवला होता ज्याने एक गेमिंग स्मार्टफोन म्हणून टेक मार्केट मध्ये एंट्री घेतली आहे. Red Magic 3 च्या लॉन्च सोबतच कंपनीने सांगितले होते कि हा फोन लवकरच ग्लोबल मंचावर पण येईल जो इंडियन मार्केट मध्ये पण विकला जाईल. आज Nubia ने हा पावरफुल स्मार्टफोन भारतीय बाजारात पण लॉन्च केला आहे. अनोख्या लुक सोबत Red Magic 3 पावरफुल स्पेसिफिकेशन्स सह येतो.

सुपरफास्ट गेमिंग

Nubia Red Magic 3 कंपनीने गेमिंग स्मार्टफोन म्हणून सादर केला आहे जो पावरफुल स्पेसिफिकेशन्स सह येतो. हा फोन Xiaomi Black Shark 2 चा मोठा प्रतिस्पर्धी असल्याचे बोलले जात आहे. गेमिंग लवर्स साठी नुबिया ने आपला फोन एयर लिक्विड कूलिंग टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे. तसेच फोन मध्ये Red Magic Game Space 2.0 मोड पण आहे जो गेमिंग एक्सपीरियंस शानदार करतो. तसेच चांगल्या विजुअल क्वालिटी साठी फोन मध्ये कंपनीने 90Hz सपोर्ट असलेला मोठा डिस्प्ले आहे.

पावरफुल स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन्स पाहता हा मेटल बॉडी वर बनला आहे. Nubia Red Magic 3 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.65-इंचाच्या फुलएचडी एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी कंपनीने फोनला 2.5डी कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्ट केले आहे. हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित रेडमॅजिक 2.0 वर सादर केला गेला आहे जो 2.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 7एनएम टेक्नॉलॉजी वरील क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 540 जीपीयू आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Nubia Red Magic 3 च्या बॅक पॅनल वर एफ/1.75 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा Sony IMX586 रियर सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 16-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. नुबिया रेड मॅजिक 3 डुअल सिम सोबतच 4जी एलटीई ला पण सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 30 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत व उपलब्धता

Nubia Red Magic 3 भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे जो येत्या 27 जून पासून कंपनी की वेबसाइट सोबत शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल. फोनचा 8जीबी रॅम व 128जीबी मेमरी वेरिएंट देशात 35,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. तसेच फोनचा 12जीबी रॅम व 256जीबी स्टोरेज वाला पावरफुल वेरिएंट 46,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

वीडियो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here