वनप्लसला टक्कर देणाऱ्या स्मार्टफोनवर मोठा डिस्काउंट; कमी किंमतीत Snapdragon 888 प्रोसेसरसह फोन

iQOO 9 SE Discount

iQOO 9 SE स्मार्टफोन भारतात क्वॉलकॉमच्या फ्लॅगशिप प्रोसेसरसह सादर करण्यात आला होता. लाँचच्या वेळी हा हँडसेट वनप्लसचा पर्याय म्हणून सादर करण्यात आला होता. आता या दमदार स्मार्टफोनवर ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट अ‍ॅमेझॉन हजारोंची सूट देत आहे. अ‍ॅमेझॉनवर iQOO 9 SE स्मार्टफोनवर सध्या धमाकेदार डिस्काउंट मिळत आहे. iQOO 9 SE स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमच्या Snapdragon 888 प्रोसेसर, 66W फ्लॅश चार्ज आणि OIS सपोर्ट असलेला 48MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. पुढे आम्ही तुम्हाला iQOO 9 SE स्मार्टफोनवर मिळणाऱ्या ऑफरची माहिती दिली आहे.

iQOO 9 SE वरील अ‍ॅमेझॉनची ऑफर

iQOO 9 SE स्मार्टफोनचा बेस व्हेरिएंट अ‍ॅमेझॉनवर 33,990 रुपयांमध्ये लिस्ट आहे. यावर अ‍ॅमेझॉनकडून 1000 रुपयांचा कुपन डिस्काउंट मिळत आहे. तसेच ICICI बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डनं EMI पेमेंट केल्यास 3000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. अशाप्रकारे एकूण 4000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. कुपन आणि बँक डिस्काउंटनंतर iQOO 9 SE स्मार्टफोनचा बेस व्हेरिएंट तुम्ही 29,990 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. तसेच तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून डिस्काउंट मिळवू शकता. हे देखील वाचा: BSNL च्या 31 दिवसांच्या या Plan नं Jio ची उडवली झोप! स्वस्तात जास्त डेटासह फ्री कॉलिंग

iQOO 9 SE स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट्स भारतीयांच्या भेटीला आले आहेत. हे दोन्ही मॉडेल अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध आहेत. फोनच्या 8GB रॅम व 128GB स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलची किंमत 33,990 रुपये ठेवण्यात आली आहे. तर टॉप एन्ड मॉडेलमध्ये 12GB रॅम व 256GB स्टोरेज मिळते. 12GB रॅम मॉडेलची किंमत 36,990 रुपये आहे. हे दोन्ही व्हेरिएंट डिस्काउंटसह विकत घेता येतील.

iQOO 9 SE चे स्पेसिफिकेशन्स

iQOO 9 SE स्मार्टफोनमध्ये 6.62-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचं रिजोल्यूशन Full HD+ आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz, मॅक्सिमम ब्राईटनेस 1300nits आहे. तसेच फोनचा डिस्प्ले HDR10+ सर्टिफिकेशनला देखील सपोर्ट करतो. iQOO च्या या स्मार्टफोनमध्ये कंपनीनं ऑप्टिकल फिंगरप्रिंट स्कॅनरची सुरक्षा दिली आहे.

iQOO 9 SE स्मार्टफोनमध्ये Qualcomm चा ऑक्टा कोर Snapdragon 888 प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबतीला ग्राफिक्ससाठी Adreno 660 GPU मिळतो. कंपनीनं यात 12GB पर्यंत LPDDR5 RAM, आणि 256GB पर्यंतची UFS3.1 स्टोरेज दिली आहे. iQOO चा हा स्मार्टफोन Android 12 वर चालतो. iQOO 9 SE स्मार्टफोनमध्ये 4500mAh ची बॅटरी आणि 66W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळते. हे देखील वाचा: 50MP कॅमेऱ्यासह झाली Vivo च्या स्वस्त 5G स्मार्टफोनची एंट्री; 12GB रॅमसह मीडियाटेक प्रोसेसरची ताकद

iQOO 9 SE स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 48MP Sony IMX598 सेन्सर आहे जो ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशनला सपोर्ट करतो. फोनमध्ये प्रायमरी कॅमेऱ्यासह 13MP ची अल्ट्रावाईड अँगल लेन्स आणि 2MP चा मोनो सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here