चार्जींगविना 120km चालेल ही HOP Leo electric scooter; किंमत 1 लाखांपेक्षा कमी, सोबत 3 वर्षांची वॉरंटी

Highlights

  • High-speed HOP Leo electric scooter चा टॉप स्पीड 52kmph आहे.
  • HOP Leo electric scooter सिंगल चार्जवर 120km पर्यंत चालवता येईल.
  • ही EV पाच कलर ऑप्शनसह 23 जानेवारीपासून HOP dealerships वर मिळेल.

ईव्ही बनवणाऱ्या कंपनी हॉप इलेक्ट्रिकनं भारतात आपल्या हॉप लियो इलेक्ट्रिक स्कूटर (HOP Leo electric scooter) चं हाय-स्पीड व्हर्जन लाँच केलं आहे. या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. यातील खासियत पाहता नवीन electric scooter फक्त एकदा चार्ज केल्यावर 120 किमीची रेंज देण्याचा दावा करते. तसेच या ई-स्कूटरचा टॉप स्पीड ताशी 52 किमी आहे. यात राइडिंग मोड्स, एलसीडी डिस्प्ले आणि एलईडी लाइटिंग सारखे फीचर देखील आहेत.

HOP Leo electric scooter price

ही high-speed HOP Leo electric scooter कंपनीनं भारतात Rs 97,000 (ex-showroom) मध्ये सादर केली आहे. तसेच ही ई-स्कूटर इच्छुक ग्राहक 23 जानेवारीपासून HOP dealerships वरून खरेदी करू शकतील. कंपनीनं ही पाच कलर ऑप्शन-Black, White, Grey, Blue आणि Red मध्ये सादर केली आहे. हे देखील वाचा: 320km रेंजसह आली Citroen eC3 EV, काही मिनिटांत होणार फुल चार्ज

HOP Leo EV Photos

कंपनी बॅटरीवर तीन वर्ष/40,000km ची वॉरंटी आणि व्हेईकलवर तीन वर्षांची वॉरंटी देत आहे. HOP Leo इलेक्ट्रिक स्कूटरची टक्कर भारतात Ola S1 Air आणि Ola S1 शी होणार हे निश्चित आहे. हे देखील वाचा: सर्वात स्वस्त नोकिया स्मार्टफोन लाँच; कमी किंमतीत शानदार स्पेक्ससह Nokia C12 ची एंट्री

HOP Leo electric scooter specifications

HOP Leo electric च्या हाय-स्पीड व्हर्जन मध्ये 2.1kWh lithium-ion battery pack देण्यात आला आहे. ही 2.9bhp आणि पीक टॉर्क 90Nm जनरेट करते. तसेच कंपनीचा दावा आहे की ही ई-स्कूटर सिंगल चार्जमध्ये 120km ची रेंज देते. तसेच हीचा टॉप स्पीड 52kmph इतका आहे. HOP Leo फक्त 2.5 तासांमध्ये 0 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज करता येईल, यासाठी कंपनीनं दिलेल्या 850W चार्जरचा वापर युजर्सना करावा लागेल.

HOP Leo electric scooter fetures

होप लियोमध्ये एलईडी लाइटिंग, डिस्क ब्रेकसह कॉम्बी ब्रेकिंग, टेलीस्कोपिक फ्रंट सस्पेंशन, एलसीडी डिस्प्ले, मोबाइल चार्जर, रीजेनरेटिव्ह ब्रेकिंग इत्यादी फीचर्स मिळतात. होप लियो मध्ये 4 राइडिंग मोड्स – इको, पावर, स्पोर्ट आणि रिवर्सचा समावेश आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 90 सेक्शन 10-इंच व्हील्स, IP65 आणि IP67-रेटेड इलेक्ट्रिकल कंपोनेंट्स, 19.75 लीटर अंडर सीट स्टोरेज स्पेस आणि 160mm ग्राउंड क्लीयरेंस मिळतो. HOP Leo ची लोडिंग कपॅसिटी 160kg आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here