आयकू ब्रँडनं भारतात आपल्या ‘झेड’ सीरीज अंतगर्त आतापर्यंत iQOO Z5 आणि iQOO Z6 सह iQOO Z6 Pro तसेचतथा iQOO Z6 Lite मॉडेल सादर केले आहेत. परंतु आता लवकरच या सेग्मेंट आणखी एक पाऊल टाकणार आहे. 91मोबाइल्सला एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे की कंपनी पुढील महिन्यात म्हणजे मार्चमध्ये नवीन स्मार्टफोन iQOO Z7 5G भारतात लाँच केला जाईल. हा आयकू मोबाइल मार्चच्या अखेरपर्यंत भारतीय बाजारात उपलब्ध होईल.
iQOO Z7 5G Launch in India
91मोबाइल्सला इंडस्ट्री सोर्सच्या माध्यमातून माहिती मिळाली आहे की आयकू भारतात आपल्या ‘झे’ सीरीजची नवीन जेनरेशन आणण्याची तयारी करत आहे. पुढील महिन्यात म्हणजे मार्चमध्ये कंपनी आपली पावरफुल iQOO Z7 मोबाइल सीरीज बाजारात सादर करेल. ब्रँडनं अद्याप सीरीजबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही परंतु होळीनंतर कंपनी हा फोन टीज करण्यास सुरु करेल.आयकू झेड 7 सीरीज मार्चच्या शेवटच्या आठवड्यात भारतात लाँच होईल तसेच मार्च मधेच विक्रीसाठी उपलब्ध होईल. कंफर्म माहिती मिळाली नाही परंतु आशा आहे की iQOO Z7 5G फोन सोबतच कंपनी iQOO Z7 Pro 5G देखील लाँच करेल. हे देखील वाचा: Vivo V27 Pro Price in India: लाँचपूर्वीच समोर आली माहिती, इतकी असेल किंमत
आयकू झेड7 5जीच्या टीजर ईमेजवरून फोनच्या डिजाईनची माहिती पण मिळाली आहे. हा मोबाइल फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. कॅमेरा सेटअप झेड सीरीजच्या जुन्या स्मार्टफोन्स सारखा असेल. प्रायमरी सेन्सर मोठ्या वर्तुळाकारत असेल तर इतर दोन लेन्स या सेन्सरच्या खाली असतील. झेड सीरीजमध्ये आतापर्यंत फ्लॅश लाईट कॅमेरा चौकोनी आकारात दिला जात होता परंतु iQOO Z7 5G मध्ये फ्लॅश सेटअपच्या बाहेरच्या पॅनलवर असेल.
iQOO Z6 5G
- 6.58″ FHD+ 120Hz Display
- 8GB RAM + 128GB Storage
- Qualcomm Snapdragon 695 5G
- 50MP Triple Rear Camera
- 16MP Selfie Sensor
- 18W 5,000mAh Battery
आयकू झेड6 5जी फोन सध्या 14,999 रुपयांची प्रारंभिक किंमतीत सेलसाठी उपलब्ध आहे ज्यात 4जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज मिळते. हा स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटवर चालतो जोडीला एड्रेनो 619 जीपीयू आहे. आयकू झेड 6 5जी मध्ये 5-लेयर लिक्विड कूलिंग सिस्टम देखील देण्यात आली आहे. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 18वॉट चार्जिंगसह 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.हे देखील वाचा: Jio च्या स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये मिळेल 84 दिवसांची व्हॅलिडिटी, फक्त My Jio अॅपवर प्लॅन उपलब्ध
iQOO Z6 5G स्मार्टफोन 6.58-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट व 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करतो. फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सल पोर्टरेट लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी आयकू 6 5जी फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.