वेगवान 5G सर्व्हिससाठी मोबाइलमध्ये ऑन करा ‘ही’ सेटिंग

How to Activate Jio 5G: Akash Mukesh Ambani यांच्या Reliance Jio टेलिकॉम कंपनीची 5जी सेवा (5G Services) भारतात दसऱ्याच्या दिवशी म्हणजे 5 ऑक्टोबरपासून लाइव्ह झाली आहे. सध्या रिलायन्स जियोनं ही सेवा देशातील चार शहरांमध्ये बीटा ट्रायल स्वरूपात सुरु केली आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार जियो 5जीची बीटा ट्रायल सेवा मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि वाराणसीच्या ग्राहकांना मिळण्यास सुरुवात झाली आहे. जर तुम्ही या निवडक शहरांमध्ये राहत असाल तर जियो 5जी सेवेचा आनंद घेऊ शकता. परंतु यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाइल (Smartphone) च्या सेटिंगमध्ये जाऊन 5जी नेटवर्क ऑन करावं लागेल. त्याची प्रोसेस म्हणजे How To Activate Jio 5G Network On Your Smartphone ची माहिती या लेखात घेऊया.

फोनमध्ये असं करा 5G network activate

जेव्हा तुमच्या आपके एरियामध्ये 5G रोल आउट होईल तेव्हा तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर काही सेटिंग्स मध्ये बदल केल्यावर 5G नेटवर्क वापरता येईल.

  • सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर ‘सेटिंग’ अ‍ॅप उघडा.
  • त्यानंतर, ‘मोबाइल नेटवर्क’ ची सेटिंग निवडा.
  • सिम सिलेक्ट करा ज्यात तुम्हाला 5G ऑन करायचं आहे.
  • इथे ‘Preferred network type’ ऑप्शनची निवड करा.
  • त्यानंतर फक्त टॅप करा आणि 5G नेटवर्क टाइप निवडा.

जर तुमच्या एरियामध्ये 5G सुरु झालं असेल तर तुम्हाला पुढील काही मिनिटांमध्ये स्टेटस बारवर 5G साइन दिसू लागेल. आम्ही एयरटेल 5G सर्व्हिसची माहिती देखील दिली आहे जी तुम्ही इथे क्लिक करून वाचू शकता. हे देखील वाचा: 50MP Camera असलेला OPPO A77s लाँच; 17 हजारांच्या बजेटमध्ये 13GB RAM ची पावर

Jio 5G कोणाला मिळेल?

जियोची 5G ट्रायल सर्व्हिस सध्या ऑन इन्व्हिटेशन निवडक युजर्सना मिळत आहे. म्हणजे जुन्हा जियो युजर्स पैकी काही निवडक युजर्सना ही सर्व्हिस वापरण्यासाठी इन्व्हाइट पाठवलं जाईल.

जियो ट्रू 5जी वेलकम ऑफर

  • Jio True 5G वेलकम ऑफर अंतगर्त ग्राहकांना 1 Gbps+ पर्यंतच्या स्पीडसह अनलिमिटेड 5G डेटा मिळेल.
  • इतर शहरांमध्ये नेटवर्क रेडी झाल्यास त्या शहरांसाठी बीटा टेस्टिंग सर्व्हिसची घोषणा केली जाईल.
  • युजर्स या बीटा टेस्टिंगचा लाभ शहरात संपूर्ण नेटवर्क कव्हरेज मिळेपर्यंत घेऊ शकतील.
  • Jio सर्व हँडसेट ब्रँड्ससह काम करत आहे त्यामुळे ग्राहकांकडे 5G डिवाइसचे असंख्य पर्याय आहेत.

Jio 4G SIM वरच मिळेल 5G सर्व्हिस

जियो ट्रू 5जीच्या बीटा ट्रायलची घोषणा करताना कंपनीनं स्पष्ट केलं आहे की जियो 5G सर्व्हिसचा वापर करण्यासाठी ग्राहकांना नवीन 5G सिमची गरज नाही. कंपनीनं माहिती दिली आहे की इन्व्हिटेशन ‘Jio वेलकम ऑफर’ युजर्सना आपलं Jio सिम बदलण्याची गरज नाही. 5G मोबाइलवर Jio True 5G सेवा ऑटोमॅटिक अपग्रेड होईल. हे देखील वाचा: शाओमीचा बाहुबली फोन! 200MP Camera आणि 120W फास्ट चार्जिंगसह Xiaomi 12T Pro ची दणक्यात एंट्री

Published by
Siddhesh Jadhav