Jio Phone 5G 2023 ची आतापर्यंत समोर आलेली लीक्ड माहिती वाचा इथे

प्रतीकात्मक फोटो

भारतीय टेलीकॉम सेक्टरचा चेहरामोहोरा बदलणारे Mukesh Ambani लवकरच 5G फोन्सची दुनिया देखील पूर्णपणे बदलण्याच्या तयारीत दिसत आहेत. कंपनीनं आपली 5जी सर्व्हिस भारतातील चार प्रमुख शहरांमध्ये सुरु केली आहे. त्यामुळे आता लोक जियोच्या स्वस्त 5जी फोनची वाट पाहत आहेत. यंदा कंपनीच्या 45व्या AGM 2022 दरम्यान अंबानींनी खुलासा केला होता की Jio आणि Google मिळून Ultra affordable 5G smartphone लाँच करतील जो जगातील सर्वात स्वस्त 5जी मोबाइल फोन असू शकतो. यावरून स्पष्ट झालं होतं की Jio Phone 5G ची बाजारातील अन्य 5G Mobile पेक्षा कमी असेल. परंतु आतापर्यंत कंपनीकडून Jio Phone 5G Launch Date, Price, specifications आणि Features ची माहिती देण्यात आली नाही. जियोफोन 5G पुढील वर्षी म्हणजे 2023 मध्ये लाँच होऊ शकतो.

Jio Phone 5G 2023

तुम्ही देखील या फोनसाठी खूप उत्सुक असाल आणि हा फोन कसा असेल हे जाणून घ्यायचं असेल. कंपनीनं जरी अधीकृतपणे कोणतीही माहिती दिली नसली तरी लीक्सच्या माध्यमातून बरीच माहिती समोर आली आहे. त्यानुसार आम्ही तुम्हाला जियोफोन 5जीच्या लीक स्पेसिफिकेशन्ससह फीचर्स आणि संभाव्य किंमतीची माहिती देणार आहोत. हे देखील वाचा: तयार व्हा! येत आहे Mahindra Electric Scooter, असा असेल लुक

  • Jio Phone 5G ची किंमत
  • Jio Phone 5G चे स्पेसिफिकेशन्स /li>
  • Jio Phone 5G चे फीचर्स
  • Jio 5G लाँच तारीख

Jio 5G Phone ची किंमत

जियो फोन 5जी 2023 च्या घोषणेबाबत विविधप्रकाराची माहिती समोर येत आहे. अलीकडेच काउंटरपॉईंट्सच्या रिपोर्टमधून या फोनच्या प्राइसची माहिती समोर आली होती. रिपोर्टनुसार रिलायन्स जियोचा 5जी स्मार्टफोन भारतात 8,000 रुपये ते 12,000 रुपयांच्या बजेटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. ही प्राइस रेंज पाहता अंदाज लावला जात आहे की Jio Phone 5G एकापेक्षा जास्त व्हेरिएंट्समध्ये सादर केला जाऊ शकतो.

Jio 5G Phone Launch Price 8000 To 12000 In India Reliance Jio Ultra-Affordable 5G Smartphone

Jio Phone 5G चे स्पेसिफिकेशन्स

91मोबाइल्सला मिळालेल्या माहितीनुसार जियो फोन 5जी फोनमध्ये 6.5 इंचाचा HD+ LCD डिस्प्ले, 90Hz रिफ्रेश रेट आणि 1600×720 पिक्सल स्क्रीन असू शकते. तसेच फोनमध्ये Snapdragon 480 प्रोसेसर, 4GB LPPDDR4X RAM आणि 32GB स्टोरेज दिली जाऊ शकते. फोनमध्ये मागे 13MP चा प्रायमरी कॅमेरा असू शकतो आणि जोडीला एक 2MP चा मॅक्रो सेन्सर मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंटला 8MP चा कॅमेरा मिळू शकतो. तसेच फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगसह दिली जाऊ शकते. रिलायन्स जियोचा आगामी स्मार्टफोन Android 12 वर चालू शकतो.

Jio 5G Phone Launch Price 8000 To 12000 In India Reliance Jio Ultra-Affordable 5G Smartphone

Jio Phone 5G चे फिचर

जियोचा हा फोन भारतातील सध्याच्या लो बजेट 5G स्मार्टफोन्सच्या तुलनेत जास्त चांगल्या 5जी बँड्सना सपोर्ट करू शकतो तसेच लो लेटन्सी आणि स्मूद 5जी नेटवर्क कनेक्टिव्हिटी मिळू शकते. यात तुम्हाला फास्ट इंटरनेट व्यतिरिक्त जियो अ‍ॅप्स सारख्या सेवा मिळू शकतात. तसेच स्थानिक भाषांचं चांगलं इंटीग्रेशन मिळू शकतं. परंतु हा बाजारात येण्यास वर्षभर वाट बघावी लागू शकते. हे देखील वाचा: 5G Mobile Phones: 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे 5 सर्वात बेस्ट 5G Phone; किंमत कमी फीचर्स भरपूर

Jio 5G Launch Speed 1gbps Unlimited 5g Data 5g Sim

Jio 5G ची लाँच तारीख

आपल्या 5जी सर्व्हिस बाबत मुकेश अंबानींनी आधीच स्पष्ट केलं आहे की 2023 च्या अखेरपर्यंत भारतात जियोची 5जी सर्व्हिस पूर्णपणे उपलब्ध होईल. त्यामुळे आशा आहे की त्याआधी कंपनी हा सादर करेल. दरवर्षी जूनच्या आसपास कंपनी आपली एजीएम मीटिंग करते आणि त्या दरम्यान हा फोन लाँच होण्याची शक्यता आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here