Mahindra ची इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच येऊ शकते बाजारात; रिपोर्टमधून खुलासा

इलेक्ट्रिक स्कूटर्सची वाढती मागणी पाहता अलीकडेच Hero MotoroCop नं आपली पहिली Electric Scooter सब ब्रँड Vida मध्ये सादर केली होती. तसेच आता बातमी समोर येत आहे की Electric Car नंतर Mahindra देखील इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये उतरण्याची तयारी करत आहे. रिपोर्ट्सनुसार महिंद्रा लवकरच Peugeot Kisbee इलेक्ट्रिक स्कूटरसह इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांच्या सेगमेंटमध्ये पदार्पण करू शकते. आता महिंद्राची इलेक्ट्रिक स्कूटी लाँचपूर्वी रस्त्यावर टेस्टिंग दरम्यान स्पॉट करण्यात आली आहे.

Mahindra Electric Scooter

ऑटो साइट Zigwheels ने एक्सक्लूसिव्हली महिंद्रा इलेक्ट्रिक स्कूटर (Peugeot Kisbee Electric Scooter) टेस्टिंग दरम्यान स्पॉट केली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर बद्दल इतर कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु असा अंदाज लावला जात आहे की लवकरच कंपनी आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात सादर करू शकते. हे देखील वाचा: 5G Mobile Phones: 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे 5 सर्वात बेस्ट 5G Phone; किंमत कमी फीचर्स भरपूर

mahindra-electric-scooter-launch-soon-india-price-range-photos

Kisbee इलेक्ट्रिक स्कूटी ग्लोबल मार्केटमध्ये आधीपासून सेलसाठी उपलब्ध आहे. आशा आहे की भारतात टेस्ट होत असलेल्या मॉडेलमध्ये देखील तीच शानदार पावरट्रेन मिळू शकते. तसेच कामगिरीच्या बाबतीत महिंद्रा इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमधील OLA, Ather, TVS आणि Bounce इलेक्ट्रिक स्कूटर्सना टक्कर देऊ शकते.

mahindra-electric-scooter-launch-soon-india-price-range-photos

Peugeot Kisbee चे फीचर्स

महिंद्रा इलेक्ट्रिक स्कूटर Peugeot Kisbee चे फीचर्स पाहता, यात अनेक हाय-फाय फीचर्स असतील. ही स्कूटर एक ट्यूबलर स्टील चेसिससह येईल, ज्यात चांगल्या ग्रिपसाठी टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क आणि हायड्रॉलिक रियर शॉक अब्जॉर्बर मिळतील. तसेच इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 14 इंचाचे टायर आहेत आणि स्कूटरमध्ये फ्रंटला डिस्क आणि मागे ड्रम ब्रेक असू शकतात.

Mahindra XUV 400 चे फीचर्स

Mahindra XUV 400 EV चे फीचर्स पाहता यात इलेक्ट्रिक सनरूफ, डिजिटल इंस्ट्रुमेंटल क्लस्टर, एरोडायनॅमिक स्वरूपात डिजाइन करण्यात आलेले 17-इंचाचे अलॉय व्हील, ड्युअल-जोन क्लायमेट कंट्रोल सिस्टम, रेन सेंसिंग वाइपरसह ऑटो हेडलॅम्प, टाइप-सी चार्जिंग आउटलेट आणि अनेक शानदार फीचर्स मिळतात. हे देखील वाचा: 90 दिवसांचा रिचार्ज प्लॅन फक्त 439 रुपयांमध्ये! जाणून घ्या ‘या’ दिवाळी ऑफरची संपूर्ण माहिती

Mahindra XUV400 ev competition electric cars in india

तसेच या इलेक्ट्रिक कारमध्ये एक IP67 कंप्लेंट 39.5 kWh बॅटरी पॅक आणि PSM मोटर आहे जी 149.5 PS ची पीक पावर आणि 310 Nm चा मॅक्सिमम टॉर्क देते. ही कार जबरदस्त रेंजसह सादर करण्यात आली आहे. लाँचच्या वेळी कंपनीनं दावा केला आहे की ही EV सिंगल चार्जमध्ये सुमारे 400-450 किलोमीटर पर्यंत चालू शकते, हिचा टॉप स्पीड 150 kmph असेल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here