खुशखबर : आता जियोफोन मध्ये पण चालेल व्हाट्सॅप, यूट्यूब आणि फेसबुक

रिलायंस जियो चे मालक मुकेश अंबानी आज आपल्या फॅन्स साठी नवीन भेट घेऊन आले आहेत. रिलायंस ​इंडस्ट्री ने आज आपल्या दुसर्‍या मोबाइल फोन ची घोषणा केली आहे. मागच्या वर्षी लॉन्च झालेल्या आणि जगभरात सर्वात जास्त विकला गेलेला फीचर फोन जियोफोन ला कंपनी ने अजून एडवांस केले आहे. रिलायंस इंडस्ट्रीज ने आज जियोफोन 2 सादर केला आहे त्याचबरोबर जियोफोन मध्ये व्हाट्सॅप आणि यूट्यूब देण्याची घोषणा पण केली आहे.

रिलायंस इंडस्ट्रीज ने आज आपल्या वार्षिक बैठकीत घोषणा केली आहे की कंपनी च्या 4जी फीचर फोन ‘जियोफोन’ मध्ये यूजर्सना आता फेसबुक सोबत व्हाट्सॅप आणि यूट्यूब चा सपोर्ट पण मिळेल. ​जियोफोन यूजर्स आता आपल्या फोन वरून फक्त यूट्यूब वर फास्ट ​स्पीड मध्ये वीडियोज बघू शकणार नाहीत तर सोबत व्हाट्सॅप वरून आपल्या मित्र आणि नातेवाईकांशी चॅटिंग पण करू शकतील. जियो ने घोषणा केली आहे की येत्या स्वतंत्र दिनी म्हणजे 15 ऑगस्ट पासून सर्व जियोफोन मध्ये व्हाट्सॅप आणि यूट्यूब ची सुविधा मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here