खुशखबर: आता जियोफोन वर चालेल व्हाट्सॅप

मागच्या वर्षी आपल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत रिलायन्स ने आपला 4जी वोएलटीई फीचर फोन जियोफोन लाँच केला होता. तेव्हापासुन कंपनी अधिकाधिक फीचर्स या फीचर फोन मध्ये देण्यासाठी प्रयत्न करत आहे. कायओएस वर चालणार्‍या या फोनला कालांतराने गूगल असिस्टेंट आणि फेसबुक अॅप चा सपोर्ट मिळाला होता. कंपनी प्रसिद्ध इंस्टेंट मेसेजिंग अॅप व्हाॅटसॅप चा सपोर्ट या फीचर फोन मध्ये देण्याचा प्रयत्न करत होती पण त्याबद्दल अजूनतरी कोणतीही बातमी आली नव्हती. पण आता कंपनीने आपल्या 41व्या वार्षिक बैठकीत घोषणा केली आहे की जियोफोन च्या नवीन वर्जन मध्ये सोशल डेडीकेटेड मीडिया अॅप्स मिळतील.

आजच्या ईवेंट मध्ये आकाश आणि ईशा अंबानी यांनी बहुप्रतीक्षित जियोफोन 2 ची घोषणा केली. जियोफोन 2 मध्ये नवनवीन फीचर्स आहेत. ज्यात क्वर्टी कीपॅड, आकर्षक किंमत आणि डेडीकेटेड सोशल मीडिया अॅप्स यांचा समावेश आहे. कंपनीने घोषणा केली आहे की काय ओएस वर चालणार्‍या या नव्या जियोफोन मध्ये  डेडीकेटेड व्हाॅटसॅप, फेसबुक आणि यूट्यूब अॅप्स प्री-इंस्टॉलड असतील.

हि त्यांच्यासाठी खुशखबर आहे जे इंस्टेंट मेसेजिंग नसल्यामुळे जियोफोन वापरत नव्हते. 1.5 बिलियन यूजर्स असलेल्या व्हाॅटसॅप मुळे जियोफोन पहिल्या फोन पेक्षा जास्त चांगले यश मिळवू शकतो. जियोफोन 2 बद्दल बोलायचे तर यात 2.4-इंचाचा क्यूवीजीए डिस्प्ले, कायओएस, 512एमबी रॅम, 4GB स्टोरेज, 2,000एमएएच बॅटरी, 2एमपी रियर कॅमेरा आणि 0.3एमपी सेल्फि शूटर आहे.

कंपनीने जियोफोन 2 ची किंमत 2,999 रुपये ठेवली आहे आणि येत्या 15 ऑगस्ट पासून हा फोन सेल साठी उपलब्ध होईल. त्याचबरोबर रिलायंस च्या मॉन्सून हंगामा ऑफर अंतर्गत जूना फीचर फोन देऊन त्यावर फक्त 501 रुपये देऊन जियोफोन 2 घेऊ शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here