Lava चा आगामी फोन लाँचपूर्वीच गीकबेंचवर दिसला; बजेटमध्ये होऊ शकतो लाँच

Highlights

  • Lava चा आगामी बजेट डिवाइस एप्रिलमध्ये सादर केला जाऊ शकतो.
  • डिवाइसची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी आणि Unisoc T616 SoC असू शकते.
  • लावाच्या आगामी फोनचे नाव Lava Blaze 2 असू शकते.

इंडियन स्मार्टफोन ब्रँड LAVA आपल्या झेड-सीरीजमध्ये एक नवीन स्मार्टफोन सादर करण्याची योजना बनवत आहे. परंतु, कंपनीनं याबाबत ऑफिशियल माहिती दिली नाही. आता लावाचा एक बजेट फ्रेंडली डिवाइस बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर दिसला आहे. लिस्टिंगमध्ये फोनच्या नावाचा उल्लेख करण्यात आला नाही. परंतु, अशी चर्चा आहे की हा एक 4G फोन असेल आणि याचे नाव Lava Blaze 2 ठेवलं जाऊ शकतं. पुढे आम्ही तुम्हाला या फोनची सर्व माहिती दिली आहे.

Lava चा नवीन फोन गीकबेंचवर लिस्ट

लावा लवकरच भारतात आणखी एक किफायतशीर स्मार्टफोन सादर करू शकते. लावाचा हा आगामी एंट्री-लेव्हल स्मार्टफोन एप्रिलपर्यंत भारतीय बाजारात उपलब्ध केला जाऊ शकतो. तसेच लिस्टिंगमधून समोर आलं आहे की डिवाइसमध्ये यूनिसॉक टी616 प्रोसेसर असू शकतो. तसेच याची किंमत 10,000 रुपयांच्या आत ठेवली जाऊ शकते. हे देखील वाचा: जियो फायबरचा स्वस्त प्लॅन लाँच; फक्त 198 रुपयांमध्ये महिनाभर अनलिमिटेड डेटा

लावा ब्लेज 2 च्या गीकबेंच लिस्टिंगवरून समजलं आहे की यात UNISOC चिपसेट असेल. या octa-core चिप मध्ये 1.82GHz ची बेस फ्रिक्वेन्सी आणि 1.95GHz चा बूस्ट क्लॉक स्पीड आहे. बेंचमार्कमध्ये मॉडेल नंबर LZX409 सह लावा ब्लेज 2 दिसला आहे. तसेच गीकबेंच 5 टेस्टिंगमध्ये सिंगल-कोर राउंडमध्ये 359 आणि मल्टी-कोर राउंडमध्ये 1497 स्कोर या फोनने मिळवला आहे. स्मार्टफोन अँड्रॉइड 12 सह येईल आणि 6GB पर्यंत रॅम मिळू शकतो. हे देखील वाचा: Moto Edge 40 Pro चे प्रोमोशनल फोटोज व रेंडर ईमेज पाहा इथे; लुक आणि डिजाईनचा झाला खुलासा

अलीकडेच अपकमिंग लावा ब्लेज 2 चा एक फोटो ऑनलाइन लीक झाला होता, ज्यामुळे फोनच्या डिजाइनची माहिती मिळाली आहे. स्मार्टफोनमध्ये एक फ्लॅट ग्लास बॅक आहे ज्यात दोन मोठे रिंग आहेत यात कॅमेरा सेन्सर आहेत. फोनच्या कडा फ्लॅट आहेत, वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन उजवीकडे देण्यात आले आहेत यातील पावर बटन फिंगरप्रिंट सेन्सरचं काम देखील करू शकतो. लीक झालेल्या इमेज मध्ये डिवाइसचा फ्रंट दिसत नाही. परंतु जाड बेजल्स आणि वॉटरड्रॉप नॉच अपेक्षित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here