या ‘खास’ डिजाइनसह भारतात येईल POCO X3 Pro, लॉन्चच्या आधी बघा लुक

POCO X3 Pro भारतात 30 मार्चला अधिकृतपणे लॉन्च केला जाईल, ज्याची माहिती कंपनीने मीडिया इनवाइट जारी करून दिली आहे. तर दुसरीकडे कंपनी 22 मार्चला एक ग्लोबल लॉन्च इवेंट होस्ट करत आहे, ज्याबाबत अफवा आली आहे की पोको एक्स3 प्रो भारताच्या आधी दुसर्‍या मार्केट मध्ये सादर केला जाईल. पण, याची माहिती समोर आली आहे. तसेच, आता POCO X3 Pro च्या लॉन्चच्याआधी याची संपूर्ण डिजाइन रेंडर्सच्या माध्यामातून समोर आली आहे.

POCO X3 सारखी असेल डिजाइन
लीक झालेल्या रेंडर्सनुसार पोको एक्स3 प्रो ची डिजाइन गेल्यावर्षी सप्टेंबर 2020 मध्ये लॉन्च झालेल्या POCO X3 सारखी असेल. हे रेंडर्स फेमस टिप्सटर ईशान अग्रवालने जारी केली आहे. सोबत माहिती दिली आहे की फोन Phantom Black, Metal Bronze आणि Frost Blue कलर ऑप्शन मध्ये एंट्री करेल.

POCO X3 Pro चा लुक
लीक रेंडर्सनुसार Poco X3 Pro पंच-होल डिस्प्लेवर लॉन्च केला जाईल. त्याचबरोबर फ्रंट पॅनलवर स्क्रीनच्या तीन कडा बेजललेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट असेल. तर स्क्रीनच्या वर मध्यभागी सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल असेल. तसेच मागे गोलाकार क्वाड कॅमेरा सेटअप एलईडी फ्लॅशसह दिसला आहे.

असेल 48एमपीचा कॅमेरा
लीक रेंडर्सवरून समजले आहे की पोको एक्स3 प्रो मध्ये 48MP प्राइमरी कॅमेर्‍यासह चार रियर कॅमेरे असतिल. विशेष म्हणजे POCO X3 64MP च्या प्राइमरी कॅमेरा कॅमेर्‍यासह लॉन्च केला गेला होता. तसेच, POCO X3 Pro च्या स्पेक्सची अजूनतरी माहिती कंपनीने दिली नाही.

POCO X3 Pro चे स्पेसिफिकेशन्स
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार पोको एक्स3 प्रो मध्ये स्नॅपड्रॅगन 860 चिपसेट दिला जाऊ शकतो जो अजूनही ऑफिशियल झाला नाही. तसेच फोन 120Hz FHD + डिस्प्लेसह सादर केला जाऊ शकतो. फोन मध्ये एक एलसीडी पॅनल असेल कारण लीक रेंडर मध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिसला आहे. तसेच POCO X3 Pro मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,200mAh ची बॅटरी पण असू शकते. हा स्मार्टफोन 48MP क्वाड कॅमेरा सिस्टमसह येईल.

तसेच, 91मोबाईल्सने काही दिवसांपूर्वी एक्सक्लूसिव माहिती दिली होती की पोको एक्स3 प्रो दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च होईल ज्यात 6GB+128GB आणि 8GB+256GB वेरिएंटचा समावेश असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here